नाशिक

निवृत्तीवेतन प्रकरणी डॉ. एस. एस. राणे यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन

CD
NSK26H22221 जळगाव : आंदोलनात बोलताना डॉ. एस. एस. राणे व विविध संघटनांचे पदाधिकारी समर्थक. --- मूलनिवासी संघटनेतर्फे डॉ. राणेंच्या समर्थनार्थ धरणे निवृत्तीवेतनासंदर्भात न्यायाची मागणी; विविध संघटनांचा पाठिंबा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला विद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांना निवृत्तिवेतनासंदर्भात न्याय मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या (आरएमबीकेएस) जळगाव शाखेतर्फे सोमवारी तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. डॉ. राणे यांनी निवृत्तिवेतन प्रकरणी झालेल्या कथित अन्यायाबाबत लेवा एज्युकेशन सोसायटी तसेच सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव यांच्याकडे वेळोवेळी निवेदने सादर केली होती. मात्र अद्याप न्याय मिळालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या आंदोलनाला आरएमबीकेएससह प्रोटॉन, आरएमबीकेएस आरोग्य विभाग, आरएमबीकेएस रेल्वे विभाग, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, टीडीएफ, भारत मुक्ती मोर्चा, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय मूलनिवासी पेन्शनर संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा यांसह विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आंदोलनाचे नेतृत्व आरएमबीकेएसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सोनवणे यांनी केले. राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानिक पद्धतीने आंदोलन पार पडले. यावेळी मिलिंद निकम, प्रमोद तायडे, शेख खलील, सुनील देहडे, प्रमोद बोरसे, एन. व्ही. भारंबे, डी. एन. पाटील, यू. डी. चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, डॉ. राणे यांची मागणी मान्य न झाल्यास ५ जुलैला पुणे येथील उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला. कोट डॉ. एस. एस. राणे यांना निवृत्त होऊन सहा वर्षे झाली. त्यांना त्यांची सर्व देयके कायदेशीर कमिटी बसवून दिली आहेत आणि त्यांनी घेतले देखील आहेत. तरी त्यांना अमान्य आहे. हे प्रकरण कायदेशीरपणे संपले आहे. त्यांना वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, संस्थेचे नाव बदनाम करून काय मिळणार आहे. - नंदकुमार बेंडाळे, अध्यक्ष, लेवा एज्युकेशन सोसायटी, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT