नाशिक

अक्राणीतील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी ३० जूनपर्यंत मुदत

CD
पीक नुकसानभरपाईसाठी ३० जूनपर्यंत मुदत केवायसीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २३ : ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असून, अक्राणी तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आपली आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर केलेली नाहीत. शासनाच्या वेबसाईटवर लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी आणि ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३० जून अंतिम मुदत देण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन अक्राणीचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मनोजकुमार ऐतवडे यांनी केले आहे. तालुक्यातील दहा हजार शंभर शेतकऱ्यांची माहिती आतापर्यंत जमा करण्यात आली आहे. मात्र, अजूनही प्रामुख्याने ५९० शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. तसेच २४४ शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार मॅपिंग नसल्यामुळे त्यांच्या शासकीय नुकसानभरपाईची रक्कम नाकारण्यात आली आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांची भरपाई रक्कम बँक खात्याच्या समस्येमुळे नाकारले गेले आहे, त्यांनी त्वरित आपल्या संबंधित बँकेत जाऊन आधार मॅपिंग करून घेणे आवश्यक आहे. तसेच ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांनी पुढील दिवसांत ती पूर्ण करून घ्यावी. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे बँक पासबुक, आधारकार्डची छायांकित प्रत, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक आदींसह कागदपत्रे जमा करावीत. ३० जून २०२६ या अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही माहितीचा विचार केला जाणार नाही. जर एखादा शेतकरी विहित मुदतीत माहिती सादर न केल्यामुळे किंवा ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे लाभापासून वंचित राहिला, तर त्यास सर्वस्वी संबंधित शेतकरीच जबाबदार राहतील, याची गंभीर नोंद घ्यावी, असेही तहसीलदार ऐतवडे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याची 'सोनम'! केतन पाय घसरून पडला नाही, खून झाला; लोहगडावर काय घडलं? तरुणीसह प्रियकराला अटक

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT