नाशिक

युनाम शिखर

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- फोटो क्रमांक : 22236 लाहुल-स्पिती : समुद्रसपाटीपासून सहा हजार १११ मीटर उंचीवर असलेले युनाम पर्वत मोहिम यशस्वी करत तिरंगा ध्वज फडकवताना सहकाऱ्यांसह साक्री येथील डॉ. राहुल देवरे. -- साक्रीच्या डॉक्टरांची युनाम शिखराला गवसणी! -- बारा सहकाऱ्यांसह सर केले कठीण मानली जाणारे उंच शिखर सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. २२ : वैद्यकीय व्यवसायातील व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत साक्री येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राहुल देवरे यांनी आपल्या १२ गिर्यारोहक सहकाऱ्यांसह हिमाचल प्रदेशातील अत्यंत दुर्गम व कठीण मानली जाणारी ‘युनाम पर्वत मोहिम’ यशस्वीरित्या फत्ते केली. समुद्रसपाटीपासून सहा हजार १११ मीटर उंचीवर असलेले हे शिखर त्यांनी १० जूनला सर करत भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज फडकवला. लाहुल-स्पिती या अत्यंत कठीण व उणे तापमानाच्या क्षेत्रात ही मोहिम राबवण्यात आली. ‘फ्रडपैक्स’ ॲडवेंचर कंपनीचे मार्गदर्शक अमन आणि योगेश यांच्या नेतृत्वात ही मोहिम पार पडली. या मोहिमेत देशभरातील विविध क्षेत्रांतील गिर्यारोहक सहभागी झाले होते. यात बडोद्याचे पूजन कमानी, मानसी रानडे, भगवान रूपरा, आरती रुहीरा, दिल्लीचे हिमांशु मिश्रा, स्नेहा मिश्रा, बेंगलुरुचे मधु के. आर., आकाश वर्मा आणि मुंबईचे मेजबिन अजमान वाला, प्रियेश थार व दिनेश पाटील या सहकाऱ्यांचा समावेश होता. सर्वांनी अत्यंत प्रतिकूल हवामानावर मात करत हे यश संपादन केले. डॉ. राहुल देवरे यांना गिर्यारोहणाची आवड असून त्यांच्या नावावर अनेक खडतर मोहिमांची नोंद आहे. यापूर्वी त्यांनी लडाखमधील ‘जो झोनगो’ पर्वत, हिमाचल प्रदेशातील ‘फ्रेंडशिप पीक’, सिक्कीममधील ‘गोचला ट्रेक’ आणि उत्तराखंडमधील अत्यंत आव्हानात्मक ‘बाली पास’ या मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

Crime News: कोर्याची सीमा! मामानं ९ महिन्यांच्या भाचीला घरातून उचलून नेलं, नंतर घडवलं घृणास्पद कृत्य; शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आढळली

Latest Marathi News Live Update : कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट

बाप-लेकीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी! 'फादर्स डे'ला रिलीज झाला 'द्विधा' चित्रपटाचा टिझर; 'या' दिवशी येणार भेटीला!

SCROLL FOR NEXT