नाशिक

गोदावरी हेल्थ सिटीतआंतरराष्ट्रीय योग दिन

CD
NSK26H22242 जळगाव : गोदावरी हेल्थ सिटी तथा वैद्यकीय महाविद्यालय प्रांगणात योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगाभ्यास व ‘योगाबिक्स’ची प्रात्यक्षिके सादर करताना विद्यार्थी. ------ गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात उपशीर्षक विविध संस्थांमधील प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोदावरी हेल्थ सिटी येथे योगाभ्यास शिबिराचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या शिबिरात योगगुरू चैतन्य क्षीरसागर तसेच योग शिक्षिका डॉ. कोमल पाटील यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. त्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांकडून सराव करून घेतला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी योगामुळे व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक संतुलन, कार्यक्षमता आणि जीवनशैलीत होणार्‍या सकारात्मक बदलांविषयी मार्गदर्शन केले. फाउंडेशन अंतर्गत कार्यरत सर्व वैद्यकीय सेवांशी संबंधित महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमात सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व अध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. ------ अभियांत्रिकी महाविद्यालय गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ या थीमअंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. योगा हॉलमध्ये प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी व तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे तसेच योगशिक्षक डॉ. अतुल बर्‍हाटे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. योग प्रात्याक्षिकासाठी प्रा. डॉ. अतुल बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापकवृंद यांनी योग प्रात्याक्षिक केले. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, बद्धकोणासन, व्रजासन, मंडुकासन, त्रिकोणासन, शवासन तसेच प्राणायाममध्ये कपालभाती,अनुलोम विलोम, भ्रामरी हे प्राणायाम करून घेतली. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT