नाशिक

विजयाची घोषणा अन्‌ आनंदोत्सव

CD
६०४८५ (पेस्टेड असेल तरी घ्या) -------------------- विजयाची घोषणा अन्‌ गुलालाची उधळण गोकूळ गितेंच्या समर्थकांकडून आनंदोत्सव सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : विधान परिषद निवडणुकीत विजयाला गवसणी घालणाऱ्या अपक्ष गोकूळ गिते यांच्या समर्थकांनी सोमवारी (ता.२२) गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘कोण आला रे कोण आला नाशिकचा वाघ आला’; एकच वादा गोकूळ दादा अशा घोषणा समर्थकांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुख इमारतीत सोमवारी (ता.२२) विधान परिषदेची मतमोजणी पार पडली. सकाळी आठपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकच गर्दी केली. या सर्व कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. मत मोजणीवेळी सकाळी साडेनऊ वाजता पहिली फेरीमध्ये १२० मतांच्या मोजणीत ९० हून अधिक मते गोकूळ गिते यांना मिळाल्याने त्यांचा विजय दृष्टीक्षेपात दिसून आला. यावेळी केंद्रातील एका प्रतिनिधीने धावत जाऊन प्रवेशद्वारावरील कार्यकर्त्यांना विजयी आघाडीचा संदेश पोहचविला. यावेळी गिते समर्थकांनी एकच जल्लोष केला. गितेंच्या विजयाची घोषणा होताच दराडेंच्या समर्थकांनी काढता पाय घेतला. साधारणत: दुपारी बाराला गिते हे विजयी प्रमाणपत्रासह मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. यावेळी समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत विजयी मिरवणूक काढली. --- विधान परिषद निवडणुकीतील विजय हा गोकूळ गिते व समर्थकांचा आहे. निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत उमेदवाराचा प्रचार केला. पण, मतदार सुज्ञ असून त्यांनी गोकूळ गिते यांना निवडून दिले. नाशिकची जागा ही शिवसेनेची असल्याने गोकूळ यांनी सेनेत प्रवेश करावा असा माझा त्यांना सल्ला असेल. - गणेश गिते, माजी स्थायी समिती सभापती, भाजप. ---------------- २२१९३ मतमोजणीपूर्वीच आक्षेप अन्‌ वाद! प्रशासनाची मध्यस्थी; समर्थकांमध्ये बाचाबाची सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : विधान परिषद निवडणुकीत सोमवारी (ता. २२) पार पडलेल्या मतमोजणीप्रसंगी अपक्ष गोकूळ गिते यांनी शिवसेना-महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव केला. पण या वेळी गिते आणि दराडे समर्थकांमधील बाचाबाची चर्चेचा विषय ठरली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी आठला प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. पण तत्पूर्वी सकाळी सातच्या सुमारास गिते व दराडे हे त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींसमवेत मतमोजणी केंद्रावर पोहोचले. या वेळी दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी विजयाचा दावा केल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला; परंतु पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करून हा वाद मिटविला. मात्र, त्यानंतरही मतमोजणी केंद्रात या वादाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नेमले. याच मुद्द्यावरून अपक्ष गिते यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुनावणी घेतली. या वेळी गिते यांच्या वकिलांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार देत ही नियुक्ती योग्य नसल्याची बाजू मांडली, तर दराडेंच्या वकिलांनी विधान परिषद निवडणुकीप्रसंगी आमदार किंवा नगरसेवकांना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नेमणूक करता येणे शक्य असल्याचा युक्तिवाद केला. या युक्तिवादावर प्रशासनाने तपासला असता दराडेंच्या बाजूचा युक्तिवाद योग्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद यांनी गितेंचा दावा फेटाळून लावला. प्रतिनिधीवरून आक्षेप मतमोजणी केंद्रामध्ये गोकूळ गिते यांचे पोलिंग एजंट मतमोजणी प्रतिनिधींसमवेत जाऊन बसले. त्यावर नरेंद्र दराडे यांनी आक्षेप घेत त्यांना जागेवरून दूर नेण्याची मागणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने पोलिंग एजंटला बाहेरचा रस्ता दाखविला. यादरम्यान मतमोजणी केंद्रात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उमेदवारांना मिळालेली मते उमेदवार..........टेबल १..........टेबल २..........टेबल ३..........टेबल ४..........एकूण गोकूळ गिते.......... ८०..........९३.......... १००.......... ८४..........३५७ नरेंद्र दराडे.......... ८५..........५२.......... ४८.......... ६३..........२४८ प्रसाद हिरे..........००..........००..........००..........००..........००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Umarga News : माजी मंत्री बसवराज पाटील यांची राजकारणात पुन्हा 'दमदार एन्ट्री'

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये टॅक्सीची तोडफोड

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

SCROLL FOR NEXT