नाशिक

अवतीभवती

CD
अवतीभवती -- ‘रात्र आहे पौर्णिमेची’ सोमवारी संगीत मैफल नाशिक : महानगरपालिका पुरस्कृत प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूरकर यांना समर्पित स्वरांजली संगीत कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (ता. २९) जूनला महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी साडेसहाला करण्यात आले आहे. क्षितीजा प्रस्तुत ‘रात्र आहे पौर्णिमेची’ या संगीत मैफलीत गायिका विद्या कुलकर्णी, मुग्धा कुलकर्णी, क्षितीज कुलकर्णी, अभिषेक नलावडे कल्याणपूरकर यांची गाणी सादर करणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला असणार आहे. -- सामुदायिक योगाभ्यासाचा वर्ग संपन्न नाशिक : विश्‍वास बँक व विश्‍वास हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सामुदायिक योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांकडून विविध आसने करून घेण्यात आली तसेच त्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. योगप्रशिक्षक पिराजी नरवाडे यांनी मार्गदर्शन करताना मनाला चैतन्यमय ठेवण्यासाठी व शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी योगसाधनेला जीवनशैलीचा भाग बनविण्याचे सांगत आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात योग जीवनात आनंद निर्माण करतो व मानसिक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असल्याचे सांगितले. यावेळी योग शिक्षक मंदार भागवत, राहुल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. -- कामतीकर यांच्या शिष्यांची सोमवारी मैफल नाशिक : स्वराजीत संगीत अकादमी प्रस्तुत स्वरसुमनांजली पद्मभूषण सुमन कल्याणपूरकर यांना आदरांजलीपर संगीत मैफलीचे आयोजन (ता. २९) सोमवारी करण्यात आले आहे. गायिका रागिणी कामतीकर यांच्या शिष्या सुमन कल्याणपूरकर यांची गाणी सादर करणार असून त्यांना प्रशांत महाले (किबोर्ड), सतीश पेंडसे (तबला) साथसंगत करतील. कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात सायंकाळी साडेसहाला कार्यक्रम होणार असून प्रवेश सर्वांसाठी खुला असणार आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकारचे संसदेत मोठं स्पष्टीकरण

Delhi Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवार गटाच्या आठ खासदारांशी भेट; मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा; राज्यात पावसाची शक्यता, पुढील ५ दिवसांचा अंदाज

Marathi News Live Updates: पुण्यातील कॅम्पमधील हॉटेलचे कुलूप तोडून दोन लाखांची रोकड लंपास

Rahul Gandhi: संसदेत येण्याचे धैर्य शहांमध्ये नाही: राहुल गांधी, विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT