नाशिक

''फार्मसी''त यश

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- आयबीपीएस कॉलेजचे ‘फार्मसी’त यश -- डिप्लोमा इन फार्मसी निकालात राखली निकालाची परंपरा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : बोरकुंड (ता. धुळे) येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित आयबीपीएस कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन फार्मसीच्या परीक्षेत यंदाही यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच घोषित झालेल्या या निकालात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. निकालात प्रथम वर्ष डिप्लोमा इन फार्मसीमध्ये ममता जालिंदर माळी हिने ७९.३० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. चेतना सावता माळी हिने ७६ टक्के गुणांसह द्वितीय तर हर्षदा प्रवीण बिराडे हिने ७२.१० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला. द्वितीय वर्षाच्या निकालातही विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. यात सुरेश त्र्यंबक बाविस्कर याने ७०.७३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. तृणाली दीपक शिरोळे हिने ६९.७३ टक्के गुणांसह द्वितीय तर तेजस्विनी नथू माळी हिने ६९.६४ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, सचिव तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शालिनी भदाणे यांच्यासह प्राचार्य डॉ. राजेश अहिरराव, डॉ. दीपिका पंडित, प्रा. हितेश नावारकर, प्रा. तृणाल सोनवणे, प्रा. संस्कार बनछोड, प्रा. यशवर्धन निंबाळकर, प्रा. केतन कठाळे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: यूपीआय पेमेंटला 'चार्ज' लागणार का? केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण; मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वेगळा नियम

Uruli Kanchan Theft: उरुळी कांचनमध्ये कोयता घेऊन फिरणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद; ४.५० लाखांची चोरी, पोलिसांवर नागरिकांचा अविश्वास

संसदेत बाजी पलटणार? मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपला मिळाली जुन्या मित्र पक्षाची साथ, मोठ्या पक्षाचा NDA ला पाठिंबा

Latest Marathi News Live Update : स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील घटना, पालक आक्रमक

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

SCROLL FOR NEXT