नाशिक

अण्णा हजारे पुरस्कार

CD
NSK26H22235 जळगाव : यजुर्वेंद्र महाजन यांचा पुरस्‍कार देऊन सन्‍मान करताना अण्णा हजारे. -------------- यजुर्वेंद्र महाजन पद्मभूषण अण्णा हजारे पुरस्कार --------- सामाजिक सेवेचा गौरव; राळेगणसिद्धी परिवारातर्फे पुरस्काराने सन्मानित सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी आणि राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने सामाजिक सेवा गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यात यंदाच्‍या पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्काराने जळगावचे यजुर्वेंद्र महाजन यांना सन्‍मानित करण्यात आले. राळेगणसिद्धी येथे आयोजित सोहळ्याला देवगडचे महंत भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित होते. पद्मभूषण अण्णा हजारे यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांच्या रकमेतील निधीच्या व्याजातून हे पुरस्कार दिले जातात. देशातील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना निवासी उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची व्यवस्था उभारणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांना पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्कार अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे राजेंद्र पाटील, अमोल लंके, मिलिंद आवळगावकर, महेंद्र पाटील, दिव्यांग विद्यार्थी बापू भोसले आणि आश्लेषा आमटे हे देखील होते. श्री. महाजन यांनी पुरस्काराची दोन लाख रुपयांची रक्कम दीपस्तंभ मनोबल पुणेच्या उभारणीसाठी दिली आहे. तर हा पुरस्कार दीपस्तंभ फाउंडेशनच्या विस्तारासाठी सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या मधुकर कोतवाल, अजय साठे, डॉ. अलका मांडके, पुखराज पगारिया, एम. के. सत्या, सुधीर वरदे, दीपक शाह, सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांना अर्पण केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT