नाशिक

मेनफिचर

CD
मेनफिचर टुडे पान चारसाठी --- सूचना : आधीचे दिलेले मेनफिचर ॲंकर घ्यावे ----------------------------------------- (आरोग्य यंत्रणेचे एआय चित्र वापरावे) --- साथरोग नियंत्रणासाठी ९० पथके तयार (उपशीर्षक) आरोग्‍य विभागाचे नियोजन; प्रत्‍येक आरोग्‍य केंद्रावर राहणार सज्ज सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. २२ : पावसाळ्याच्‍या दिवसात साथरोग पसरण्याची शक्‍यता अधिक असते. या अनुषंगाने आरोग्‍य विभागाने नियोजन आखले आहे. त्‍यानुसार जिल्ह्यात साथरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर १ तर तालुकास्तरावर १० तर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ७९ पथक तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्यात दूषित पाणी पिण्यात आल्‍याने तसेच डासांचा अधिक प्रादुर्भाव झाल्‍यास साथरोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असतो. डेगी, अतिसार, चिकनगुनिया या साथीच्या आजाराचा प्रामुख्याने जिल्ह्यात अनेक वेळा प्रादुर्भाव झाला आहे. ज्‍या गावात ही समस्‍या उद्‌भवते तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्‍य पथक गावात तळ ठोकून राहते. दरम्‍यान, यावर्षी साथीच्या आजारांचा फैलाव झाल्यास पथक तयार केले आहेत. रुग्‍णवाहिका दुरूस्‍त पावसाळ्यात प्रामुख्‍याने जलजन्य आजार (अतिसार, डायरिया, गॅस्ट्रो विषमज्वर) व कीटकजन्य आजार हिवताप, डेंगी व चिकनगुनिया यामध्ये रुग्णवाढ होते. त्या अनुषंगाने आजारांच्या नियंत्रणासाठी उपययोजना करण्यात येणार आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. तसेच शासकीय वाहन किंवा रुग्णवाहिका दुरुस्त करून घेतली आहेत. औषधसाठाही उपलब्ध पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावर उपचारासाठी आवश्यक औषधांची यादी सर्व ७९ प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोग किट उपलब्ध आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे औषधसाठा ३ महिने पुरेल एवढा आहे. मागील तीन वर्षात जलजन्य आजार व कीटकजन्य आजाराचा उद्रेक झालेली गावे यासह आजारांचा फैलाव होण्याची शक्‍यता असलेले जिल्‍ह्यातील ३२८ जोखिमग्रस्त गावांची माहिती घेतली आहे. या गावांमध्ये प्राधान्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. इन्‍फो नियंत्रण कक्षही स्थापन प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका आरोग्य कार्यालय येथे २४ तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कार्यालयात संबंधित आजारांची माहिती मिळताच त्‍याची संपुर्ण माहिती संकलित करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: पोटासाठी कारखान्यात मजुरी अन् स्वप्नासाठी फुटबॉल... दुहेरी लढाई लढणारा पोरगाच ठरला जर्मनीचा 'तारणहार'

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT