नाशिक

आत्मा मालिक गुरुकुलात शालेय साहित्याचे वाटप

CD
फोटो - NSK26H22258 पुरणगाव : येथील आत्मा मालिक गुरुकुलात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ध्यक्ष हनुमंतराव भोंगळे, संत भागवत गिरी महाराज, प्राचार्य राजेश पाटील, मुख्याध्यापक योगेश सोनवणे व राहुल नरोडे. आत्मा मालिक गुरुकुलात शालेय साहित्याचे वाटप सकाळ वृत्तसेवा पुरणगाव, ता. २२ : आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली. या वेळी गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे, संत भागवत गिरीजी महाराज, प्राचार्य राजेश पाटील, मुख्याध्यापक योगेश सोनवणे व राहुल नरोडे, पर्यवेक्षक तेजस राऊत, शिक्षकवृंद तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत तर सुनीता वाघ, शीतल महाले, प्रियंका फाटककर, रामदास वाघ यांची स्वागतपर भाषणे झाली. मल्लखांब दिनाचे औचित्य साधत क्रीडा शिक्षक प्रवीण घोगरे यांनी मल्लखांबाचे महत्त्व स्पष्ट केले. शाळेतील विविध शैक्षणिक, क्रीडा व संस्कारवर्धक उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. गुरुकुलातील शिक्षकांनी सादर केलेली नाटिका व ‘देवा मला शाळेत जायचं हाय’ आणि ‘स्कूल चले हम’ हे सामूहिक नृत्य आकर्षण ठरले. प्रतिभा मगर आणि मनिषा गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

Loni Kalbhor Crime: कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार लोणी काळभोरमध्ये पोलिसांच्या सापळ्यात

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

SCROLL FOR NEXT