नाशिक

अवैध वाळू वाहतूकीसाठी अवैध वाळू वाहतूकीसाठी अवैध वाळू वाहतूकीसाठी

CD
(वाळूचे छायाचित्र वापरावे) तिमाहीत दीड कोटींचा दंड; तरीही अवैध वाळू जोमात जिल्ह्यातील चित्र; ९८ प्रकरणे उघडकीस; २७ गुन्ह्यांमध्ये १२ संशयितांना अटक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२३ : जिल्ह्यात अवैध वाळू, मुरूम आदी गौण खनिज वाहतुकीची ९८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यांना गेल्यात तीन महिन्यात एक कोटी ६२ लाखांचा दंडही केला आहे. तरीही अवैध वाळू वाहतूक जोमात सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्याला अवैध गौण खनिज वाहतुकीला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. गेल्या एप्रिल ते २० जून २०२६ दरम्यान तीन महिन्यात ट्रक, डंपर, ट्रॅक्टर आदी वाहने जप्त करीत तब्बल एक कोटी ६२ लाख ६७ हजार ७२८ रूपयांची दंडात्मक कारवाई केली. यात जेसीबी साधनांचा समावेश आहे. याप्रकरणी २७ दाखल गुन्ह्यात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनांतर्गत गौण खनिकर्म विभागांतर्गत स्थानिक स्तरावर १४ वाळू गटांपैकी ७ वाळू गटांची तसेच जानेवारी ते मे दरम्यान अन्य वाळू गटांच्या लिलाव प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र लिलाव झाले नाहीत. या वाळू गटांमधून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या अवैध वाळू वाहतूक कारवाईसंदर्भात विविध उपविभागीय तसेच तहसील प्रशासन पातळीवर पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत सर्वांत जास्त ८९ अवैध वाळू वाहतूक प्रकरणांची नोंद करण्यात आली असून तब्बल ८८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात १ कोटी ३३ लाख ८५ हजार ४८३ रूपये दंड आकारणी करण्यात आली असून ५३ लाख १८ हजार ७७ रूपये महसूल वसूल झाला आहे. अवैध मुरूम वाहतूक प्रकरणात ४ गुन्हे नोंद असून ४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात १५ लाख ६१ हजार ३२० रूपये दंडात्मक कारवाईपोटी २ लाख रूपये दंडाचा भरणा झाला आहे. माती वाहतूकसंदर्भात २ वाहने जप्त असून ८ लाख ६१ हजार ५५५ रूपये दंडापैकी १ लाख ११ हजार ५५५ रूपये भरणा झाला आहे. दगड वाहतूक प्रकरणी ३ वाहने जप्त असून ४ लाख ५९ हजार ३७० रूपये दंड जमा झाला आहे. चौकट वाहनांवर जप्तीची कारवाई आतापर्यंत एप्रिल ते २० जून २०२६ या तीन महिन्यात ९८ अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी १ कोटी ६२ लाख ६७ हजार ७२८ रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात २७ गुन्ह्यात १२ जणांना अटक करण्यात आली असून ६० लाख ८९ हजार २ रूपये महसूल वसूल झाला आहे. अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी एप्रिल २०२५ ते १५ फेबुवारी २०२६ दरम्यान ट्रक, डंपर, ट्रॅक्टर अशा लहान-मोठ्या ५७३ वाहनांवर जिल्हा प्रशासनाकडून सुमारे सात कोटी ५६ लाख ७० हजार २३८ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Satara Fraud: सातारा लघुपाटबंधारे विभागातील मोठा गैरप्रकार उघड; २८ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, दोन ठेकेदारांवर गुन्‍हा

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! सायन सबवेमध्ये गुडघाभर पाणी, वाहतूक ठप्प; वाहनधारकांची तारांबळ

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

SCROLL FOR NEXT