नाशिक

वडिलांना अग्निडाग

CD
धुळे : टुडे पान ४ साठी.. -- फोटो क्रमांक : 22256 - दीपक तोरवणे. -- लेकीने निभावले मुलाचे कर्तव्य -- पंधरा वर्षीय नयनाने दिला वडिलांना अग्निडाग सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : बेहेड (ता. साक्री) येथील प्रगतशील शेतकरी दीपक शिवाजी तोरवणे (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता. २२) सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी दीपक यांची मुलगी नयना दीपक तोरवणे हिने वडिलांच्या पार्थिवास मुखाग्नी दिला. - दीपक तोरवणे यांना एकुलती एक मुलगी आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या १५ वर्षीय मुलगी नयना दीपक तोरवणे हिने धाडस दाखवत वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. समाजात आजही अंत्यविधीचे हक्क पुरुषांना देण्याची प्रथा असताना तोरवणे कुटुंबाने मुलगी नयनाच्या हस्ते अंत्यसंस्कार पूर्ण केले. साक्री तालुका हा नेहमीच पुरोगामी विचारसरणीचा तालुका म्हणून ओळखला जातो. कुटुंबाने दुःखद प्रसंगात घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्याची ही पुरोगामी ओळख समाजमनावर आणखीनच अधोरेखित झाली आहे. दीपक तोरवणे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. ते एस.टी. महामंडळातील निवृत्त चालक शिवाजी तोरवणे यांचे सुपुत्र, नाशिकस्थित संजय तोरवणे व मुंबईस्थित अभियंता राजेश तोरवणे यांचे बंधू, तर नाशिकस्थित व्यावसायिक मिलिंद देवरे यांचे शालक होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Umarga News : माजी मंत्री बसवराज पाटील यांची राजकारणात पुन्हा 'दमदार एन्ट्री'

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT