नाशिक

मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी ताब्यात

CD
NSK26H22274 नंदुरबार : जप्त केलेल्या दुचाकींबरोबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिस निरीक्षक हेमंत पाटील. --- दुचाकी चोरणारी आंतरराज्यीय टोळी ताब्यात --- ७ लाख ५० हजार रुपयांच्या २१ दुचाकी जप्त सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २२ : दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपयांच्या २१ दुचाकी जप्त केल्या आहेत. टोळीकडून नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. म्हसावद ते राणीपूर रोडवर दोन अनोळखी व्यक्ती विना क्रमांकाच्या दुचाकीवर फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळाली. त्यावरून त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. सुरेश संतोष मुखडे (वय २०, रा. राखी, ता. पानसेमल जि. बडवाणी), सुनील भाबल्या वळवी (२०, चार्लीफाटा, ता. पानसेमल) यांना रिद्धी-सिध्दी गणपती मंदिराजवळ पथकाने ताब्यात चौकशी केली. त्यांनी दुचाकी धडगाव येथून चोरी केल्याची संशयितांनी कबुली दिली. संशयितांनी गुलाबसिंग ऊर्फ गुलच्या इसमा वळवी (रा. चार्लीफाटा) त्यांचा आणखी एक साथीदाराच्या मदतीने नंदुरबार जिल्हा तसेच, मध्य प्रदेश व गुजरात राज्यात दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्या दुचाकी त्यांच्या गावी लपवून ठेवल्याची कबुली दिली. पथकाने गुलाबसिंग वळवी यास ताब्यात घेऊन चारही संशयितांनी लपविल्या सात लाख ३० हजार रुपयांच्या २१ दुचाकी हस्तगत केल्या. संशयितांवर नंदुरबार शहर, नंदुरबार उपनगर, शहादा पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. पथकाला नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. पुणे येथील २, गुजरात राज्यातील ६ व मध्यप्रदेश राज्यातील ३ व उत्तर प्रदेशातील १, असा एकूण १८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. उर्वरित तीन दुचाकींच्या मुळ मालकांचा शोध सुरू आहे. पोलिस अधिक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर अधिक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, हवालदार सजन वाघ, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, योगेंद्र सोनार, मोहन ढमढेरे, अंमलदार यशोदीप ओगले, विशाल मराठे, सचिन सैंदाणे यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT