नाशिक

राष्ट्रवादी कॉंग्रेस बैठक

CD
फोटो- २२२६२ मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेसाठी राष्ट्रवादीचा जिल्हाभर दौरा दिलीप खैरे आठ दिवस घेणार तालुका व विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा युनिटतर्फे आठ दिवसांचा जिल्हाभर दौरा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा होणार आहे. मोहिमेची माहिती तळागाळातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खैरे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, तालुका आणि शहरात जाऊन बैठका घेणार आहेत. या बैठकींमध्ये मतदार यादीतील पात्र मतदारांची नोंदणी, नवमतदारांचा समावेश, आवश्यक दुरुस्त्या, बूथस्तरावरील संघटन बळकटीकरण आणि पक्षविस्तार याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संघटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खैरे यांनी सोमवारी जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्ष आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने सविस्तर विचारमंथन करण्यात आले. ‘प्रत्येक तालुक्यात जाऊन एसआयआर मोहिमेबाबत माहिती दिली जाईल. या मोहिमेत पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे,’ असे खैरे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद तसेच नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक अध्यक्ष चेतन कासव, युवती अध्यक्षा पूजा आहेर, नाशिक लोकसभा युवक अध्यक्ष योगेश निसाळ, विद्यार्थी अध्यक्ष राहुल कदम, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. योगेश गोसावी यांच्यासह विविध विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

Marathi News Live Updates : अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर भडकले

Flipkart Freedom Sale 2026: 8 ऑगस्टपासून सेल; iPhone पासून लॅपटॉपपर्यंत मोठी बचत! ऑफर्स पाहून व्हाल खुश, शॉपिंगपूर्वी नक्की वाचा!

SCROLL FOR NEXT