नाशिक

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

CD
NSK26H22270 जळगाव : जळगाव एसटी विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारावर संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलन करताना एसटी कर्मचारी. ---- जळगावात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन वेतनवाढ, आर्थिक सवलती देण्याची कृती समितीची मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव येथील विभागीय कार्यशाळा प्रवेशद्वारावर संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, आर्थिक लाभ तसेच इतर प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. २०१६-२० या कालावधीतील वेतनवाढीचा लाभ लागू करण्यासह एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली. तसेच एसटी महामंडळासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांबाबत निर्णय घ्यावा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवांचे नियमितीकरण करावे, अशीही मागणी करण्यात आली. आंदोलनात मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनात गोपाल पाटील, विलास सोनवणे, प्रशांत चौधरी यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Monsoon Arrival: प्रतीक्षा संपली! पुण्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवसांत कसा असेल पाऊस? हवामान विभागाची माहिती

Akola Atrocity Act News: अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रकरणांत कायद्याचे तंतोतंत पालन करा : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे निर्देश

मोठी बातमी! TMC च्या ६० आमदारांनी ममता बॅनर्जीना अध्यक्षपदावरून हटवलं, अभिषेक बॅनर्जींनाही केलं सस्पेंड, राजकारण तापलं...

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Latest Marathi News Live Update: पीकविम्याच्या योजनेत बदलाची गरज सॅटेलाइट सर्वेत अडचण; लाभातून यवतमाळ जिल्हा वगळला

SCROLL FOR NEXT