नाशिक

नाशिकमधील दगाफटक्याने जळगावात युतीत बेबनाव

CD
नाशिकमधील दगाफटक्याने जळगावात महायुतीत ‘फटाके’ उपशीर्षक युती धर्म पाळला : शिवसेना; गितेंच्या मतांची चौकशी : भाजप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : विधान परिषद निवडणुकीत जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. दुसरीकडे, नाशिकला शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव होऊन भारतीय जनता पक्ष बंडखोर गोकुळ गिते यांचा विजय झाला. नाशिकला भाजपने दगाफटका केला, आम्ही मात्र युतीधर्म निभावला, असा दावा सेनेने केला; तर गितेंना मिळालेल्या मतांची चौकशी करावी लागेल, असे भाजपने म्हटले आहे. एकंदरीत नाशिकच्या निकालाने जळगावात महायुतीत बेबनाव निर्माण झाला असून, येणाऱ्या काळात हे वितुष्ट आणखी वाढत जाण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तवली जाते. विधान परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. २२) जाहीर झाला. जळगाव स्थानिक प्राधिकार मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची भरभरून ५८२ मते मिळाली. नाशिकला मात्र बंडखोर उमेदवार गोकुळ गिते निवडून आले. तेथे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला. दराडेंनी त्याबाबत प्रचंड संताप व्यक्त केला. मात्र, नाशिकच्या निकालाने जळगावात महायुतीत कमालीचा बेबनाव निर्माण झाला आहे. ---- NSK26H22277 : विष्णू भंगाळे कोट नाशिकला माघार झाल्यावर जळगावात आमच्या उमेदवाराने नंदू महाजनांना पाठिंबा दिला. शिवसेनेने सर्वच्या सर्व पहिल्या पसंतीची मते भाजप उमेदवाराला देत युतीधर्म पाळला. नाशिकला मात्र आमच्या उमेदवाराचा घात झाला. - विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना ----- NSK26H22276 (किशोर पाटील) उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी जळगावात माघार घेण्याबाबत आम्हाला दम भरला. आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करीत शिवसेनेची सर्व पहिल्या पसंतीची मते भाजप उमेदवाराच्या मागे उभी केली. अगदी दुसरा पसंतीक्रमही आम्ही टाकला नाही. नाशिकला मात्र आमचे उमेदवार तब्बल ७५ मतांनी पराभूत झाले, याचा अर्थ काय? - किशोर पाटील, आमदार, पाचोरा ---- NSK26H22278 नाशिकला शिवसेनेच्या उमेदवाराबद्दलच स्थानिक नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता, अशी माहिती आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनीच गितेंना निवडून दिले. भाजपची मते फुटली, असे म्हणता येणार नाही. गितेंना मिळालेल्या मतांची चौकशी झाली पाहिजे, म्हणजे कुणी मते दिली ते समजेल. - डॉ. राधेश्‍याम चौधरी, जिल्हाध्यक्ष, भाजप (पश्‍चिम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

Pune Crime: दूध भेसळप्रकरणी पोलिसांचा धडाका; आणखी १० आरोपी अटकेत, एकूण २४ जणांना बेड्या

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद अन् थेट हल्ला; मारहाणीत ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू, कोलदऱ्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट

'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT