नाशिक

ड्रग्स तस्करीत संशयीतांचे अर्ज दाखल

CD
ड्रग्स तस्करीत संशयितांचे अर्ज दाखल कारागृहातील तौसिफचा जामीन अर्ज; फरारी भिस्तीची ‘अटकपूर्व’साठी धाव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२२ : कृषी उत्पन्न बाजार समिती जवळून ताब्यात घेतलेल्या कारमधून ड्रग्ज मिळून आले होते. ड्रग्स विक्री प्रकरणात गुन्हेशाखेने चौघांना अटक केली. तर त्यांचे दोन साथीदार ड्रग्ज पेडलर अद्याप फरार आहेत. त्यापैकी फरारी संशयीत इम्रान ऊर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती (रा. शाहूनगर) याच्यातर्फे अटकपूर्व जामिनासाठी तर कारागृहातील तौसिफ सय्यद आरिफ याने जामिनासाठी जिल्‍हा न्यायालयात धाव घेतली आहे. दोघांच्या अर्जावर तपास यंत्रणेला दोन दिवसांत (ता.२४) म्हणणे मांडावे लागणार आहे. पोलिसांनी ड्रग्ज पेडलर रईस देशमुख, तौसिफ सय्यद आरिफ व कृणाल उर्फ लकी पाटील यांच्याकडून ६ लाख रुपयांचे ड्रग्ज हस्तगत करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारमधून ड्रग्जची विक्री करणाऱ्या तिघाना पकडल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये रईस देशमुख याने ते ड्रग्ज अमजद उर्फ बिल्डर शेख (रा. फातेमा नगर) याच्याकडून तौसिफ आरिफ याने इम्रान उर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती (रा. शाहूनगर) याच्याकडून तर कृणाल उर्फ लकी पाटील याने अनवर पटेल (रा. सुप्रीम कॉलनी) यांच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली होती. फरार असलेल्या अमजद उर्फ बिल्डर शेख व इम्रान उर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती याचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून, त्यातील इम्रान उर्फ इम्मा भिस्ती याने अटकपूर्वसाठी तर न्यायालयीन कोठडीतील संशयित ड्रग्ज पेडलर तौसिफ सय्यद आरिफ याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे मांडण्यास सांगितले असून, २४ जूनपर्यंत तपास यंत्रणा आपले म्हणणे सादर करण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT