नाशिक

अक्राळे गावात कृषिदूतांचे आगमन

CD
NSK26H22275 अक्राळे : येथे क.का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी. --------- अक्राळे गावात होणार कृषिसंस्कृतीचा जागर कृषिदुतांकडून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची होणार जनजागृती सकाळ वृत्तसेवा दिंडोरी, ता. २२ : तालुक्यातील अक्राळे येथे क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी उद्योग आधारित कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अक्राळे गावात आगमन झाले. या कृषिदूतांमध्ये कार्तिक जाधव, विशाल लोखंडे, अतुल जाधव, समाधान बोडके आणि अभिषेक गटकळ यांचा समावेश आहे. कृषिदूतांनी सरपंच अर्चना डांगळे, ग्रामपंचायत अधिकारी अनिल ढेरिंगे यांची भेट घेतली. सरपंच डांगळे यांनी गावातील शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये, विविध पिकांची लागवड पद्धती, पाण्याची उपलब्धता व कमतरता तसेच शेतकऱ्यांसमोरील विविध समस्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पुढील काही दिवसांत कृषिदूतांकडून शेतभेटी, मृदा परीक्षण, पिकांच्या वाढीचे निरीक्षण, कीड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन आणि फळबाग लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याची माहिती कृषिदूतांनी दिली. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव के. एस. बंदी, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, प्राचार्य व्ही. एस. संधान, प्रा. पी. एस. बस्ते, प्रा. के. जे. गुळवे, प्रा. पी. एम. क्षीरसागर, प्रा. डी. एस. गांगुर्डे, प्रा. एन. एस. घोगरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एस. देवरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT