नाशिक

नंदुरबारात एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

CD
NSK26H22281 नंदुरबार ः एस.टी. आगारात आंदोलन करताना कर्मचारी. --- एसटी कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी आंदोलन राज्यातील १७ संघटनांतर्फे कृती समितीची स्थापना सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २३ : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी येथे आंदोलन केले. बारा वर्षांपासून वेतन आणि भत्त्यांचा फरक मिळालेला नसल्याने राज्यातील कृती समितीच्या वतीने आंदोलन पुकारले होते. विविध १७ संघटना या आंदोलनात एकवटल्या होत्या. येत्या सोमवारपर्यंत शासनाने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा, लालपरीसह चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे. नंदुरबार आगारात सोमवारी (ता. २२) एसटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गेल्या बारा वर्षांपासून विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठी कर्मचारी लढा देत आहेत, मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी कृती समितीने दिला. वेतनातील फरक, एक टक्के पगारवाढीची थकबाकी, घरभाडे भत्ता, तसेच २०२० पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी अद्यापही मिळालेली नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. सरकारकडे आमच्या हक्काची रक्कम प्रलंबित असून, ती तातडीने देण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. राज्यातील १७ संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना केली असून, शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या सोमवार (ता. २९)पासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईच्या ५,५७५ कोटींच्या मेट्रो प्रकल्पास मंजुरी, राज्य सरकारकडून हिरवा कंदील

भीषण अपघात! बसमधून उरताच ट्रकने उडवलं, चिमुकलीसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर...

Maharashtra Rain Update: मान्सूनची आगेकूच! महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD ची मोठी अपडेट

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांवर जणूकाय देवाचीच कृपा! बोलतील ते होतं खरं, यांच्याशी पंगा घेणाऱ्यांना बसतो मोठा फटका

मुंबई किंवा पुणे नाही तर अनुश्री मानेने 'या' ठिकाणी खरेदी केलंय हक्काचं घर; 'या' कलाकारांनी दिली भेट; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT