नाशिक

​लग्नकार्य आटोपून परतताना काळाचा घाला; दोन ठार

CD
NSK26H22284 : किरण राक्षे (मृत) ---- दुचाकींची धडक; तीन ठार --- पाळधीजवळ अपघात; ​लग्नकार्य आटोपून परतताना घडली घटना सकाळ वृत्तसेवा पाळधी (ता. धरणगाव), ता. २२ : पाळधी- सावदा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. अन्य एक गंभीर जखमी आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ​पथराड (ता. धरणगाव) येथील लग्न सोहळा पद्मालय येथे होता. लग्न आटोपून किरण बाबूलाल राक्षे आणि बाबूलाल श्‍यामराव राक्षे दुचाकीने (एमएच १९, ४२१३) घराकडे परतत होते. ​ते सावदा रस्त्यावरून जात असताना, समोरून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव दुचाकीशी (एमएच १९, बीएन ५१४५) त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. ​हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांवरील प्रत्येकी एक जागीच ठार झाला. यात ​किरण राक्षे (रा. पथराड, ता. धरणगाव) व ​प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. निंभोरा, ता. सोयगाव) हे मृत झाले. ​तसेच, दुचाकीवर मागे बसलेले ​बाबूलाल राक्षे (पथराड) व ​चेतन पाटील (३५, वाडे गुढे, ता. भडगाव) गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चेतन पाटील यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. पथराड, निंभोरा आणि वाडे गुढे परिसरावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नोंदणीच्या कामासाठी शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

Mhada Lottery: मुंबईकरांची गृहस्वप्नपूर्ती! म्हाडाच्या २,६४० घरांची सोडत जाहीर; पुढील लॉटरी कधी?

Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीचा पहिला हप्ता आजपासून जमा?; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत निर्णय शक्य

Hardik Pandya Deal: हार्दिकची CSK सोबतची डिल का फिसकटली? ऋतुराज गायकवाडचं नाव आलंय चर्चेत, Mumbai Indians च्या कॅप्टनच्या मागण्या वाचाल तर...

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT