नाशिक

धुळ्यात दोन घरफोड्या

CD
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर शेजारी.................(मास्क हेडला नेव्हीगेशन करणे) -- धुळ्यात दोन घरफोड्या - बंद घरातून लाखांचा ऐवज लंपास सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : शहरातील दोन वेगवेगळ्या भागातील बंद घरे फोडून चोरट्यांनी एक लाख ८३ हजार ५३० रुपयांचा ऐवज लंपास केला. मिल परिसर आणि गोळीबार टेकडी रोडवरील या घटनांप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील रागिणी हिरामण पाटील (वय ६७, रा. प्लॉट क्रमांक ११, धनाई पुनाई कॉलनी) या बाहेरगावी गेल्या असताना १७ ते २० जूनदरम्यान चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व २५ हजारांची रोकड, असा ८८ हजार ५०० रुपयांचा ऐवज नेला. यामध्ये ४९ ग्रॅम सोन्याचे हार, टोंगल, मंगळसूत्र, नथ, रिंगा, कुडके, पोत, अंगठी तसेच ७० ग्रॅम चांदीचे दोन वाळे यांचा समावेश आहे. दुसरी घटना गोळीबार टेकडी रोडवरील प्रसन्न गृहनिर्माण सोसायटीत घडली. रवींद्र देवीदास नगराळे हे कुटुंबासह बाहेर गेले असताना चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. कपाटातील ९० हजारांची रोकड, चांदीचा शिक्का तसेच पितळ व तांब्याची भांडी असा ९५ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

बुमराह, साई सुदर्शनसह स्टार्स दुखापतग्रस्त; VVS Laxman यांचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, 'CoE केवळ रिहॅब सेंटर नाही, तर...'

काजू कतली खरेदी केली अन् डब्यात आढळल्या जिवंत अळ्या; ग्राहकाच्या तक्रारीनंतर FDAची मॉलवर कारवाई

Chikhaldara Accident: सेल्फी घेताना तोल गेला अन् दरीत कोसळले; चिखलदऱ्यात बार्शीटाकळीतील ४० वर्षीय युवकाचा मृत्यू, मित्रांसोबत फिरायला गेले अन्..

Pune Nashik Highspeed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग बदलला; अमोल कोल्हेंच्या निष्क्रियतेमुळेच हे घडले, भाजपचा आरोप

SCROLL FOR NEXT