योगदिनी विद्यार्थ्यांनी घेतले
निरोगी आरोग्याचे धडे
---
NSK26H22308
नंदुरबार : योग दिन कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.
एस. ए. मिशन हायस्कूल
नंदुरबार : येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षी ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी योगशिक्षक प्रसाद दीक्षित व शारदा पाटील यांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांचे मार्गदर्शन लाभले. उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा आणि पर्यवेक्षक मिनल वळवी आदी उपस्थित होते.
---
NSK26H22309
नंदुरबार : योग दिनप्रसंगी उपस्थित योगशिक्षक नितीन पाटील, संकुलाचे प्राचार्य बी. डी. पाटील.
गावित शैक्षणिक संकुल, ठाणेपाडा
नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा येथील के. डी. गावित शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. योगशिक्षक नितीन पाटील आणि संकुलाचे प्राचार्य बी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक झाले. नितीन पाटील यांनी योग दिनाचे महत्त्व विशद केले. बी. डी. पाटील यांनी योग दिनाची माहिती दिली. सुरेखा सूर्यवंशी यांनी योगासने व प्राणायाम ही काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राथमिक मुख्याध्यापक राजेंद्र सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
---
NSK26H22315
नंदुरबार : योग दिन कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य मुकेश पाटील, संजय विसपुते, सुरेश पाटील, शशिकांत पाटील आदी.
गावित शैक्षणिक संकुल, कोरीट
नंदुरबार : तालुक्यातील कोरीट येथील के. डी. गावित शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. विविध योगासने, प्राणायाम व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुकेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संजय विसपुते, सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, राकेश पाटील, व्ही. एस. पाटील, विश्वासराव शिरसाट, चारुशीला निकम, मीनाक्षी पाटील, ज्योत्स्ना देवरे, प्रा. भरत चव्हाण, प्रा. नयना पवार, प्रा. सुनील खाडे, प्रा. स्वाती बारी, प्रा. प्रशांत बोरसे, सुनंदा पाटील, सविता पाटील, कौशिक बाविस्कर, किशोर भिलावे, निता पाटील आदी उपस्थित होते. रवींद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालनकेले. विश्वासराव शिरसाठ यांनी आभार मानले.
---
NSK26H22317
नंदुरबार : योग दिन कार्यक्रमात योग प्रात्यक्षिक करताना साधक.
द्वारकाधीश मंदिरात योग दिन
नंदुरबार : श्री द्वारकाधीश मंदिर प्रांगणात योगसाधना शिबिर झाले. योग आनंद योग क्लास यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिबिरात योगशिक्षक नंदू सोनी यांनी मार्गदर्शन केले. द्वारकाधीश मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या योगोत्सवामुळे सहभागी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.