नाशिक

जिल्ह्याला सव्वाचारशे कोटींचे महसुली उदिष्ट

CD
जिल्ह्याला सव्वाचारशे कोटींचे महसुली उद्दिष्ट जिल्हा प्रशासन : गौण खनिजमध्ये घट; अधिकारी विवंचनेत सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : राज्य सरकारने यंदा जिल्ह्याला ४२५ कोटींचे महसुली वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट ठरविताना गौण खनिजमध्ये ५० कोटींची घट केली असली, तरी जमीन महसुलात केवळ पावणेतीन कोटींची कपात झाली आहे. सरकारने अगोदरच महसूल विभागाच्या अधिकारांना कात्री लावली असताना २२५ कोटींचे जमीन महसूल उद्दिष्ट दिल्याने अधिकारी विवंचनेत आहेत. राज्यस्तरावरून दर वर्षी जिल्ह्यांना महसूल वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येते. २०२६-२७ या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्याला ४२५ कोटींचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले आहे. त्यामध्ये जमीन महसूलचे २२५ कोटी, तर गौण खनिजच्या २०० कोटींच्या उद्दिष्टाचा समावेश आहे. मात्र, राज्यस्तरावरून आलेले हे उद्दिष्ट पाहून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मुळातच २०२५-२६ या आर्थिक वर्षात शासनाने महसूल उद्दिष्ट देताना त्यात भरमसाट वाढ केली होती. त्यामध्ये जमीन महसुलासाठी २२७ कोटी ७५ लाखांचे, तर गौण खनिजाच्या २५० कोटींचा समावेश होता. एकीकडे शासनाने उद्दिष्टात वाढ केलेली असताना महसूल विभागाकडील बिनशेती, अनधिकृत बिनशेती तसेच इतर काही अधिकार काढून घेतले. परिणामी जिल्हा प्रशासनाच्या महसूल उद्दिष्टालाच थेट धक्का पोहोचला. जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात जमीन महसुलाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ३१ मार्च २०२६ ला १५१ कोटी १९ लाखांचा महसूल जिल्ह्यातून गोळा झाला. गौण खनिजच्या २५० कोटींपैकी १८६ कोटी ९६ लाख शासकीय तिजोरीत जमा करण्यात प्रशासनाला यश मिळाले. त्यामुळे गेल्या वर्षीचा अनुभव तसेच अधिकारांमधील कपात बघता यंदा जमीन महसुलाच्या उद्दिष्टात घट होईल, अशी प्रशासनाला आशा होती. प्रत्यक्षात शासनाने गौण खनिजमध्ये ५० कोटींची घट करून २०० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. त्या तुलनेत जमीन महसुलामध्ये केवळ पावणेतीन कोटींची कपात करून २२५ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे मार्चअखेरीस उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाऱ्यांना आत्तापासूनच कामाला लागावे लागणार आहे. तालुक्यांसाठी उद्दिष्ट ठरणार राज्य सरकारने जिल्ह्यासाठी ४२५ कोटींचे एकूण उद्दिष्ट ठरवून दिले आहे. हे उद्दिष्ट आता पंधरा तालुक्यांत वाटप करण्यासाठी प्रशासन काम करते आहे. पुढील आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्येक तहसील कार्यालयाला यंदा त्यांच्या वाट्याला किती उद्दिष्ट आले याची माहिती मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT