नाशिक

धरणात ५५ दिवसांचा पाणी साठा

CD
पान तीन मेन -------------------- शहराला १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा त्र्यंबकेश्‍वरच्या पावसाने दिलासा, काश्‍यपीत १२०० दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : पावसाने ओढ दिल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध पाणी साठ्याचा हिशोब मांडला जात आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. विशेष म्हणजे गोदापात्रात कुंभमेळ्याची कामे सुरु असल्याने काश्‍यपी मध्ये १२०० दशलक्ष घनफुट पाणी अद्यापही शिल्लक असल्याने नाशिककरांना दिलासा आहे. त्यातच त्र्यंबकेश्‍वर भागात पावसाचे आगमन झाल्याने येथील पाणी काश्‍यपी व गौतमी धरणात पोहोचून पुढे गंगापूर धरणात येणार असल्याने पातळीत वाढ होणार आहे. शहराला गंगापूर धरण समुह, मुकणे व दारणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मुख्यत्वे शहराच्या बहुतांश भागात गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. येथून दररोज १५ दशलक्ष घनफुट पाणी उचलले जाते तर मुकणे धरणातून पाच दशलक्ष घनफुट पाणी उचलले जाते. गंगापूर धरण समुहात काश्‍यपी व गौतमीचा समावेश होतो. गोदापात्रात गोदाघाट, रामकाल पथ, कुंड विस्तारीकरणासह विविध कामे सुरु असल्याने गंगापूर धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गंगापूर धरणात काश्‍यपी मधून सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले. सध्या १२०० दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक असल्याने पावसाच्या ओढीने चिंताग्रस्त असलेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. वास्तविक कुंभमेळ्यात गोदावरी नदी प्रवाही ठेवावी लागणार असल्याने त्यासाठी पाण्याची तजबीज आहे. मात्र, पुरेसा पाऊस न पडल्यास साठवून ठेवलेले पाणी वापरात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ------------------- उपलब्ध पाण्याची सद्य:स्थिती गंगापूर, काश्‍यपी व गौतमी या समुहात एकुण ९ हजार ३५० दशलक्ष घनफुट पाणी असून शहरासाठी ४६०० दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित आहे. सद्य:स्थितीत ८६८ दशलक्ष घनफुट पाणीसाठा शिल्लक आहे. मुकणे धरणाची क्षमता सात हजार २३९ दशलक्ष घनफुट आहे. त्यात नाशिकसाठी १६०० दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित आहे. त्यातील १२९२ दशलक्ष घनफुट पाणी वापरात आले आहे. या धरणातून दररोज पाच दशलक्ष घनफुट पाण्याचा उपसा केला जातो. मुकणे धरणात ३०८ दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक आहे. गंगापूर मधील उपलब्ध पाण्याचा विचार करता ५५ दिवस तर मुकणेचे पाणी साधारण ६१ दिवस पुरेल इतके आहे. परंतु, मुकणेचे पाणी वळविता येत नसल्याने ज्या भागात पुरवठा होतो त्या भागाला दिलासा आहे. दारणा धरणाचे पाणी मुख्यत्वे नाशिक रोडसाठी वापरात येते. महापालिकेसाठी २०० दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित असून येथून आरक्षित पाण्याचा उपसा पुर्ण झाला आहे. आतापर्यंत २२७ दशलक्ष घनफुट पाणी उचलण्यात आले आहे. ------------------------ शहरात ५८ दिवस पुरेल इतके पाणी शहरासाठी आरक्षित असलेल्या एकुण पाण्यापैकी ११७२ दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक आहे. दररोज २० दशलक्ष घनफुट पाणी उपसा होतो. त्यानुसार पाणी कपात न करताही साधारण ५८ दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. पाऊस न पडल्यास काश्‍यपी मधील १२०० दशलक्ष घनफुट पाणी वापता येणार आहे. परंतु, त्र्यंबकेश्‍वर भागात पावसाला सुरुवात झाल्याने गौतमी व काश्‍यपीच्या पाणीसाठ्यात वाढ होवून पुढे तेच पाणी गंगापूर धरणात पोहोचणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT