नाशिक

गोकुळ गितेंनी घेतली आमदारकीच शपथ

CD
गोकुळ गितेंनी घेतली आमदारकीची शपथ सभागृहात फडणवीसांची मिश्कील टिप्पणी; नाशिकमध्ये समर्थकांचा जल्लोष सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : विधान परिषदेच्या सभागृहात मंगळवारी दुपारची वेळ. एकामागून एक नवनिर्वाचित सदस्य शपथ घेत होते. त्याच वेळी नाव पुकारले गेले ‘गोकुळ सुनीता बबन गिते...’ आणि नाशिकच्या राजकारणातील नव्या अध्यायाला अधिकृत सुरुवात झाली. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विजयी झालेले गोकुळ गिते यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून ईश्वरसाक्ष शपथ घेतली. भारताच्या संविधानाविषयी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगण्याची, देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता जपण्याची, तसेच आपल्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडण्याची प्रतिज्ञा त्यांनी सभागृहात केली. शपथ पूर्ण होताच त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय’ असा जयघोष केला आणि सभागृह दणाणून गेले. मात्र त्यानंतर घडलेल्या एका प्रसंगाने वातावरणात हलकाफुलका रंग भरला. सभागृहातून कोणीतरी ‘जय गिरीश महाजन’ अशी घोषणा दिली. अचानक झालेल्या या घोषणेमुळे सदस्यांमध्ये हशा पिकला. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी साधत, ‘अन् ऑफिशियल काही केलं असेल तर सांगून द्या, आता काही राहिलं नाही,’ अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यांच्या या वाक्यावर सभागृहात पुन्हा एकदा जोरदार हास्याची लाट उसळली. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राज्यातील १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतून निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी पार पडला. त्यामध्ये गोकुळ गिते यांचाही समावेश होता. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गिते यांचे कुटुंबीयही सभागृहात उपस्थित होते. मातोश्री सुनीता गिते, पत्नी उज्ज्वला गिते, बंधू गणेश गिते, भावजय व नगरसेविका दीपाली गिते तसेच मित्रपरिवाराने हा सोहळा जवळून अनुभवला. दरम्यान, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून गोकुळ गिते यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा १०९ मतांनी पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडविली होती. निकालानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेचे सहयोगी आमदार म्हणून काम करण्याची भूमिका जाहीर केली होती. आता विधिमंडळात अधिकृत शपथ घेतल्यानंतर गोकुळ गिते यांच्या राजकीय प्रवासाला नवे वळण मिळाले असून, नाशिकच्या राजकारणातील त्यांच्या नव्या इनिंगकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

Donald Trump: 'होर्मुझ'मधील निर्बंध अखेर शिथिल होणार; इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT