NSK26H22310
जळगावः जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आंदोलन करताना कार्यकर्ते.
........
ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण
पद्धतीविरोधात आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करताना लोकसंख्या व सामाजिक वास्तवाचा विचार करण्यात आलेला नाही, असा आरोप करीत बहुजन मुक्ती पार्टीने आंदोलन केले. शासनाच्या २५ व २६ मे २०२६ च्या निर्णयामुळे आरक्षण प्रक्रियेत अन्याय होत असल्याचा दावा पक्षाने केला आहे. या निर्णयाविरोधात राज्यातील ३५८ तालुके व ३६ जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून निवेदने देण्यात आली. जळगाव तालुका बहुजन मुक्ती पार्टीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन दिले. जिल्हा युवा अध्यक्ष सुनील देहडे व तालुकाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आरक्षण निश्चित करताना संबंधित प्रवर्गाची लोकसंख्या असलेल्या वॉर्डांना प्राधान्य द्यावे आणि शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य समीक्षा प्रभारी सुमित्र अहिरे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.