नाशिक

बसेसचा थांबा

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- फोटो क्रमांक : 22329 तरवाडे : येथे मागणीनुसार जलद बसेस थांबा मंजूर झाल्यानंतर थांबलेली बस. यावेळी उपस्थित ग्रामस्थ. -- तरवाडे गावाला जलद बसेसचा थांबा -- आमदार भदाणे यांच्या निर्देशानंतर अंमलबजावणी -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : तरवाडे (ता. धुळे) गावाला अखेर अती जलद, जलद व निम जलद एसटी बसेसचा अधिकृत थांबा मंजूर झाला आहे. आमदार राम भदाणे यांच्या निर्देशानंतर आणि सततच्या पाठपुराव्यामुळे एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. सोमवार (ता. २२) पासूनच या सर्व गाड्या गावात थांबू लागल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी समस्या दूर झाली आहे. - तरवाडे ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून जलद बसेसना गावात थांबा मिळावा अशी सातत्याने मागणी केली जात होती. या समस्येची दखल घेत आमदार भदाणे यांनी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष आग्रहामुळे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष तरवाडे गावाला भेट दिली. त्यांनी स्वतः गावात बसेस थांबवून चालक व वाहकांना यापुढे येथे नियमित थांबा घेण्याच्या कडक सूचना दिल्या. यावेळी गणेश देसले, जितू माळी, डॉ. मनोज पाटील, नारायण जमादार, बापू जमादार, शाम पाटील, रणवीर जमादार, विकास पाटील, मनोहर पाटील, विजय माळी, नीतेश पवार, बाबाजी बाविस्कर, मीराबाई पाटील, कोळीलाबाई पाटील, आशा पाटील, अरुणाबाई राजपूत, वैजंताबाई पाटील यांच्यासह ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

Thane Illegal Schools: प्रवेशापूर्वी सावध व्हा! ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रशासनाचा इशारा

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT