नाशिक

मुकबधिर असोसिएशन निवडणूक

CD
धुळे टुडे २ साठी अँकर... --- फोटो-NSK26H22334 धुळे ः जिल्हा मूकबधिर असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना ॲड. राहुल वाघ. --- मूकबधिर असोसिएशन अध्यक्षपदी प्रशांत मोरे --- त्रैवार्षिक निवडणूक ः काही जागा बिनविरोध, काही जागांसाठी मतदान --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ ः जिल्हा मूकबधिर असोसिएशनची सन-२०२६-२९ या कार्यकाळासाठी त्रैवार्षिक निवडणूक २१ जूनला झाली. यात असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रशांत मोरे यांची तर मयूर बोरसे यांची बिनविरोध निवड झाली. इतर काही जागांसाठी मतदान झाले. -- धुळे शहरातील मालेगाव रोडवरील यल्लमा मंदिराजवळील महापालिका शाळेत सकाळी अकरा ते सायंकाळी पाचदरम्यान मतदान झाले. मतदानानंतर लगेचच मतमोजणी झाली. यात काही जागा बिनविरोध तर काही जागांसाठी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. प्रमुख पदे बिनविरोध धुळे जिल्हा मूकबधिर असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोरे, उपाध्यक्षपदी गुलाम अन्सारी, सचिवपदी बोरसे व सहसचिवपदी राहुल बैसाणे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच महिला सदस्यपदी भारती चित्ते, अर्चना पवार व हीना अन्सारी यांचीही बिनविरोध निवड झाली. चुरशीची लढत खजिनदार पदासाठी सुमिर कुरेशी आणि जुनैद खान यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये सुमिर कुरेशी यांना ५० मते मिळाली तर जुनैद खान यांना १८ मते मिळाली. त्यामुळे कुरेशी यांची खजिनदारपदी निवड झाली. तीन सदस्य पदांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. त्याचा निकाल असा ः समाधान कोळी-२६ मते (विजयी), आकाश पावरा- १५ मते (विजयी), रोहन वाणी- १५ मते (विजयी), मयूर गवळे- १२ मते. पदाधिकाऱ्यांचा सत्कार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात अला. ॲड. राहुल वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणूक निकालानंतर आकाश कापूरे यांनी उपस्थितांना संघटनेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच नवीन कार्यकारिणी मंडळाला भविष्यातील वाटचालीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी नीलेश मोरे, गुलाम अन्सारी, रवींद्र चुरेटे, मनेश पाटील, सोहेल तेली, शाहिद खाटिक यांनी परिश्रम घेतले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT