नाशिक

व्हॉट्सॲप ग्रुपवर अधिकाऱ्यांची बदनामी

CD
व्हॉट्सॲप ग्रुपवर अधिकाऱ्यांची बदनामी मालेगाव, ता. २३ : व्हॉट्सॲप ग्रुपवर शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध अर्वाच्च आणि आक्षेपार्ह भाषा वापरून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी आर्वी येथील विलास पाटील यांच्याविरुद्ध मालेगाव येथील कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार आर. पी. कुवर हे ‘चलो राळेगण सिद्धी’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील आहेत. त्यांचे चिरंजीव सध्या धुळे येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या ग्रुपमध्ये संशयित विलास पाटील यांनी धुळ्यातील तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याविरोधात आक्षेपार्ह व चुकीच्या शब्दांचा वापर केला. हा प्रकार समोर आल्यानंतर, शासकीय अधिकाऱ्यांची जाहीर बदनामी केल्याप्रकरणी निवृत्त नायब तहसीलदार आर. पी. कुवर यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलिसांनी विलास पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशाच्या राजकारणात मोठा बदल... विरोधकांना कमजोर समजणं NDAला पडलं महागात? दोन-तृतीयांश बहुमताचं स्वप्नाचं काय झालं?

Post Office Scheme: FD पेक्षा भारी ही पोस्टाची स्कीम? फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक अन् 7.5% व्याजदर? पाहा संपूर्ण गणित

Riddhi Thakkar: लेकीचा मृतदेह आणायला जन्मदात्याचा १००० किमी प्रवास, समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : नाशिक पुन्हा हादरलं! ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

SCROLL FOR NEXT