नाशिक

रावल कॉलेज

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- रावल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व -- तंत्रनिकेतनची यशाची परंपरा कायम; विविध शाखांतील विद्यार्थी ठरले अव्वल -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : दोंडाईचा येथील श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षेत यश संपादन केले. नुकत्याच जाहीर झालेल्या या निकालात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध शाखांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. - निकालात इलेक्ट्रिकल शाखेत प्रथम वर्षात शुभांगी बडगुजर (७६.५९ टक्के), द्वितीय वर्षात हृतिक पाटील (७२.५९) तर तृतीय वर्षात दीप देवरे (७७.७२) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मेकॅनिकल शाखेत प्रथम वर्षात अनिकेत पाटील (७०.३३), द्वितीय वर्षात ज्ञानेश्वर धनगर (६९.५६) आणि तृतीय वर्षात निखिल पाटील (७५.१३) यांनी अव्वल स्थान पटकावले. कॉम्प्युटर शाखेत प्रथम वर्षात निपुण नेरकर (७५.४१) तर द्वितीय वर्षात मधुर मगरे (८२.४७) यांनी विशेष गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. सिव्हिल शाखेत प्रथम वर्षात मयूर जाधव (७२.६७) आणि द्वितीय वर्षात गौरव कोलपकर (६९.४४) यांनी प्रथम येत यश संपादन केले. संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाने यशाची परंपरा निर्माण केली आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव सी. एन. राजपूत, सहसचिव आर. टी. गिरासे, सहसचिव डी. एन. जाधव, सामान्य प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे, प्राचार्य डॉ. डी. एम. पटेल, प्राचार्य एम. डी. पाटील, उपप्राचार्य बी. डी. गिरासे तसेच उपप्राचार्य के. डी. सोनार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: यूपीआय पेमेंटला 'चार्ज' लागणार का? केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण; मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वेगळा नियम

संसदेत बाजी पलटणार? मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपला मिळाली जुन्या मित्र पक्षाची साथ, मोठ्या पक्षाचा NDA ला पाठिंबा

Latest Marathi News Live Update : पुन्हा एकदा पुणेरी बॅनर चर्चेत... आगळ्या -वेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT