नाशिक

नाशिकमध्ये एक लाख वृक्षांची लागवड

CD
नाशिकमध्ये एक लाख वृक्षांची लागवड हरित कुंभ-हरित मॉन्सून उपक्रम : २८ जूनपासून प्रारंभ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर-परिसरात हरित कुंभ-हरित मॉन्सून उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये २८ जून ते २५ ऑक्टोबर या कालावधीत एक लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. हरित कुंभ-हरित मॉन्सून उपक्रमासंदर्भात मंगळवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपक्रमाचा आढावा घेतला. ‘स्वच्छ, हरित व सुंदर नाशिक’ संकल्पनेवर ‘उन्नत नाशिक अभियान’ ही लोकचळवळ राबविण्यात येत आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिनापासून (१ मे) त्यास सुरुवात झाली. उपक्रमाचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रात १७ मेस चार हजारांपेक्षा अधिक देशी जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. जागतिक पर्यावरणदिनी (५ जून) नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचा भाग म्हणून एक लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. शहर-परिसरात लोकसहभागातून वृक्षलागवड करण्यात येईल. या उपक्रमासाठी लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय व निमशासकीय विभाग, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्था, सामाजिक व पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत संघटना, विविध आस्थापनांची मदत घेतली जाणार आहे. त्या संदर्भाने बैठकीत चर्चा झाली. या वेळी उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, कुंभमेळामंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. १८ रविवार उपक्रम वृक्षलागवड अभियानास २८ जूनपासून प्रारंभ होणार असून, १८ रविवार हा उपक्रम राबविण्यात येईल. यामध्ये बियांचे सीडबॉल तयार करून त्यांचे रोपण केले जाईल. तसेच कुसुमाडी पॅटर्नच्या माध्यमातून वृक्षलागवड अपेक्षित आहे. त्यामध्ये मोकळ्या जागेत वृक्षलागवडीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण, महापालिकेसह विविध शासकीय विभाग, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची मॉन्सून वृक्ष लागवड समिती गठित करण्यात येणार आहे. फोटो क्रमांक : एच-22346

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमध्ये आगीचं रौद्ररूप, परिसरात धुराचे मोठे लोट; गॅरेजला अचानक लागलेल्या आगीचा VIDEO VIRAL

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

हर्षवर्धन राणे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये? पुण्याजवळील पानशेतमध्ये दोघांची गुपचूप ट्रिप? एका पोस्टने वाढली चर्चा

Horrible Video: सेलिब्रेशन पडले महागात, ब्राझिलचा फुटबॉलपटू थेट पडला 'खोल' खड्ड्यात; Live सामन्यातील घटनेनंतर सर्वांची पळापळ

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT