नाशिक

विद्यापीठ सामंजस्‍य करार

CD
NSK26H22340 जळगाव ः उद्योजकता विकास कक्ष उभारणीबाबत सामंजस्य करारप्रसंगी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी, प्रा. अनिल डोंगरे, केसीआयआयएलचे संचालक डॉ. राजेश जावळेकर व कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे. --- उमविंतर्गत उद्योजकता विकास कक्ष --- ८२ महाविद्यालयांमध्‍ये उभारणीबाबत सामंजस्य करार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड लिंकेजेस (केसीआयआयएल) तर्फे नवोपक्रम आणि उद्योजकता विकास कक्ष उभारले जात आहेत. यात प्रतिनिधींसाठी प्राध्यापक अभिमुखता कार्यक्रमात ८२ संलग्नित महाविद्यालयांमध्ये उद्योजकता विकास कक्ष उभारणीसंदर्भात ८२ सामंजस्य करार करण्यात आले. तसेच, पाच स्टार्टअपचा प्रारंभ कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी यांच्या हस्ते झाला. विद्यापीठाच्‍या पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेच्या सभागृहात मंगळवारी (ता.२३) हा कार्यक्रम झाला. मंचावर वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्राचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, केसीआयआयएलचे संचालक डॉ. राजेश जावळेकर व कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे उपस्थित होते. कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले, की आजच्या आधुनिक तंत्रज्ञान व एआयच्या जगात विद्यार्थ्यांनी इतरांपेक्षा वेगळा विचार करावा. वेगळी संकल्पना मांडावी. त्या संकल्पनेला योग्य दिशा देण्याचे काम केसीआयआयएलद्वारे केले जाते. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. भारतात नवसंकल्पना व नवउद्योजकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. देशाला समृद्ध करण्यासाठी नवउद्योजक होऊ पाहणाऱ्यांनी टॅलेंट, टेक्नॉलॉजी व इनोव्हेशन हे गुण जोपासले पाहिजेत. पाच स्‍टार्टअपचे लोकार्पण केसीआयआयएल अंतर्गत विकसित झालेल्या अमन व श्रवण पाटील यांच्या मेंटार सारथी (भडगाव), कौशल शिंदे यांच्या हेअरएक्स (भुसावळ), भूशरा शेख यांच्या स्कील्स टू अर्न (जळगाव), हरीश वाघ व यश अहिरराव यांच्या कॉप मॅप सॉफटवेअर (धुळे) आणि सागर देवकर यांच्या ज्ञान सेतू या स्टार्टअप्सच्या उत्पादनांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, विद्यापीठाशी संलग्न ८२ महाविद्यालयांसोबत नवोपक्रम व उद्योजकता परिसंस्था बळकट करण्यासाठी सामंजस्य करारांचे आदान-प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT