नाशिक

महिला धोरण आवाहन

CD
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर -- एकल महिला धोरणासाठी शुक्रवारपर्यंत सूचना पाठवा - धुळे जिल्हा महिला- बाल विकास अधिकाऱ्यांचे नागरिकांना प्रतिसादाचे आवाहन - किंवा - महिला धोरणासाठी शुक्रवारपर्यंत सूचना पाठवा - धुळे जिल्हा महिला- बाल विकास अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व पुनर्वसनाशी संबंधित प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्यात येत आहे. या धोरणाच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व तज्ज्ञांनी आपले अभिप्राय व सूचना शुक्रवारपर्यंत (ता. २६) पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी केले आहे. - महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात येणाऱ्या या धोरणात एकल महिलांच्या विविध समस्या, गरजा आणि अपेक्षांचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्व संबंधितांनी सध्याच्या अडचणी आणि त्यावर सुचविलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर अभिप्राय पाठवणे आवश्यक आहे. - १४-१ ‘या’ मुद्द्यांवर हव्या सूचना धोरणाचा मसुदा अधिक प्रभावी करण्यासाठी विविध विषयांवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. ते विषय असे ः रोजगार व उपजीविका- महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी रोजगाराच्या संधी. हक्क व सुरक्षितता- मालमत्ता व वारसा हक्क, एकल महिलांची सुरक्षा आणि सामाजिक सहभाग वाढविणे. शिक्षण व निवारा- अपत्यांचे शिक्षण, निवारा आणि पुनर्वसनाच्या योजना. कायदेशीर बाजू- पोटगी, न्यायालयीन दिरंगाई, प्रलंबित खटल्यांतील सुधारणा आणि कायदेशीर अडचणी. शासकीय योजना- योजनांच्या अंमलबजावणीतील सुधारणा, नवीन उपक्रम आणि अनिष्ट रूढी-परंपरांमधील अडथळे दूर करणे. - १४-१ ...चौकट... १४-१ असा नोंदवा आपला अभिप्राय इच्छुक नागरिक व तज्ज्ञांनी शुक्रवारी (ता. २६) सकाळी अकरापर्यंत आपल्या सूचना या माध्यमांद्वारे सादर कराव्यात, असे आवाहन आहे. पत्त- जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, धुळे. ई-मेल आयडी- dwcddhule@gmail.com, व्हॉट्सॲप क्रमांक- ८२०८५ ८९१९५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT