सोन्यात दोन, चांदीत
१२ हजारांची घट
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : सुवर्ण बाजारात सोमवारी (ता. २२) सोन्याच्या भावात एक हजार २०० रुपयांची, तर चांदीत पाच हजारांची वाढ झाली होती. मात्र, मंगळवारी (ता. २३) सोन्यात दोन हजारांची, तर चांदीत तब्बल १२ हजारांची घसरण झाली.
सोमवारी सोने एक लाख ४६ हजार ५०० रुपयांवर (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होते. त्यात मंगळवारी दोन हजारांची घट झाली. सोने एक लाख ४४ हजार ५०० रुपये होते. सोमवारी चांदी दोन लाख ४२ हजारांवर (प्रतिकिलो, विनाजीएसटी) होती. त्यात १२ हजारांची घसरण होऊन चांदी दोन लाख ३० हजारांवर आली आहे.
काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव
तारीख--- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो, विनाजीएसटी)
१५ जून--- १ लाख ५० हजार ४००--- २ लाख ५४ हजार
१७ जून--- १ लाख ५० हजार--- २ लाख ५० हजार
१८ जून--- १ लाख ४८ हजार ६००--- २ लाख ४७ हजार
१९ जून--- १ लाख ४५ हजार ५००--- २ लाख ३७ हजार
२१ जून--- १ लाख ४५ हजार ३००--- २ लाख ३७ हजार
२२ जून--- १ लाख ४६ हजार ५००--- २ लाख ४२ हजार
२३ जून--- १ लाख ४४ हजार ५००--- २ लाख ३० हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.