धुळे : टुडे पान ३ साठी..
--
फोटो क्रमांक : 22343
धुळे : महाराष्ट्र बटालियनच्या योग शिबिराप्रसंगी कर्नल सुदीप मिश्रा यांच्यासह मान्यवर.
--
धुळ्यात छात्र सैनिकांची योग साधना
--
४८ महाराष्ट्र बटालियनचे शिबिर; आरोग्यासह शिस्तीचे धडे
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर ४८ महाराष्ट्र बटालियन धुळे यांच्या वतीने होत असलेल्या दहा दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. २० ते २९ जून दरम्यान चालणाऱ्या या शिबिरात पहाटेपासूनच छात्र सैनिकांमध्ये योग साधनेचा उत्साह पाहायला मिळाला.
-
कार्यक्रमाला ४८ महाराष्ट्र बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो मन आणि शरीराचा समतोल राखण्याचे उत्तम साधन आहे. सैनिकी शिस्तीत योगाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कर्नल मिश्रा यांनी छात्र सैनिकांना मार्गदर्शन करताना केले. या शिबिरात धुळे, साक्री, मालेगाव आणि चाळीसगाव येथील विविध शाळा-महाविद्यालयांचे ४४१ छात्र सैनिक सहभागी झाले आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनासाठी ४८ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर मोहम्मद इकबाल, लेफ्टनंट डॉ. भूषण अहिरराव, लेफ्टनंट एस. ए. सांगळे, नायब सुभेदार सुखदेव सिंह, हवालदार अमोल क्षीरसागर, हवालदार शशिकांत पाटील आणि हवालदार जयसिंह जाधव यांनी परिश्रम घेतले. या वेळी एसओ सैय्यद जिशान अली, एसओ स्वाती अहिरे यांच्यासह बटालियनचा सर्व लष्करी व नागरी स्टाफ उपस्थित होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.