नाशिक

आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

CD
आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेशप्रक्रिया सुरू ६ जुलैला पहिली गुणवत्तायादी; १ जुलैपासून स्वयंम अर्ज नूतनीकरणाची संधी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा झाल्यानंतर आता आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेच्या प्रवेशप्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार कार्यवाहीचे आदेश आयुक्त लीना बनसोड यांनी सर्व अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी आणि गृहपाल यांना दिले. प्री-मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रवेश अर्ज १६ जून २०२६ पासून सुरू झाले आहेत. त्यांची गुणवत्तायादी ६ जुलै २०२६ ला प्रसिद्ध होईल. याव्यतिरिक्त ज्युनिअर कॉलेज, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेश अर्ज १ जुलै २०२६ पासून सुरू होणार आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची गुणवत्तायादी २२ जुलैला प्रसिद्ध केली जाईल. १ जुलैपासून स्वयं योजनेच्या अर्जाचे नूतनीकरण करता येणार आहे. शासकीय वसतिगृह प्रवेशप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार आहे. पात्र अर्जांची पडताळणी करण्याची संपूर्ण जबाबदारी गृहपालांवर सोपविण्यात आली असून, अपात्र अर्ज कोणत्याही परिस्थितीत मंजूर होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना आदिवासी विकास आयुक्त बनसोड यांनी दिल्या आहेत. दरम्यान, वसतिगृहाची मंजूर क्षमता १०० टक्के पूर्ण भरल्याचे प्रमाणपत्र संबंधित गृहपालांकडून प्राप्त झाल्यानंतरच प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वयं योजनेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज वर्ग करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना विद्यार्थ्यांची गुणवत्तायादीत निवड होईल, त्यांनी सात दिवसांच्या आत प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांचा प्रवेश रद्द करून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याचा विचार केला जाईल. तसेच, जुन्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत वसतिगृह प्रवेश नूतनीकरण करणे आवश्यक असून, ३० दिवसांची मुदत उलटल्यानंतर प्रवेश रद्द समजला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

"तयारी सुरू..." Vaibhav Sooryavanshi च्या अवघ्या दोन शब्दांच्या पोस्टने वेधलं लक्ष; Video शेअर करत प्रतिस्पर्ध्यांना इशारा

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Pune Crime : धर्मप्रसाराच्या आरोपावरुन ब्रिटनमधील धर्मगुरुवर गुन्हा दाखल

Supreme Court: राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा, कारवाईमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT