नाशिक

अंनिस जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांचा सन्मान

CD
NSK26H22356 जळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा बैठकीत बोलताना प्रा. डी. एस. कट्यारे. -------- अंधश्रद्ध व्यक्तीला करुणा, आपुलकीची आवश्यकता -------- प्रा. कट्यारे : ‘अंनिस’च्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सन्मान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : परिस्थितीशी हतबल, अगतिक झालेला व्यक्ती भरकटून बुवा बाबांच्या दरबारी बसतो व त्याचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण होते. त्यामुळे अंधश्रद्धेत फसलेल्या व्यक्तीला क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची अधिक गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्ह्याची बैठक नुकतीच झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते. आगामी काळात जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ''वैज्ञानिक दृष्टिकोनयुक्त शाळा'' व ''लर्निंग फेलोशिप''अंतर्गत विशेष कार्यक्रम राबविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. यावेळी निरीक्षक कट्यारे यांनी अहिल्यानगर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचा वृत्तांत मांडला. मंचावर राज्य पदाधिकारी विश्वजीत चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, जिल्हा प्रधान सचिव रवींद्र चौधरी, सुनील वाघमोडे व शहराध्यक्ष प्रा. डॉ. युवराज वाणी उपस्थित होते. ------- उत्कृष्ट शाखा पुरस्कार जामनेर व अमळनेर शाखा तसेच लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, जळगाव शहर कार्याध्यक्ष मीनाक्षी चौधरी, जामनेरचे तीर्थराज सुरवाडे, अमळनेरचे डॉ. दिनेश पाटील यांना मिळाला. या बैठकीसाठी शहर शाखा कार्याध्यक्ष मीनाक्षी चौधरी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT