नाशिक

हिरवेगार जळगावसाठी मनपा-ग्रीन सिटी फाउंडेशनची एकत्र मोहिम

CD
हिरवेगार जळगावसाठी मनपा-ग्रीन सिटीची मोहिम शहरभर व्यापक वृक्षारोपण होणार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : वाढते तापमान आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी महापालिकेने ‘ग्रीन सिटी’ उपक्रमांतर्गत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी महानगरपालिका आणि ग्रीन सिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहराचे तापमान कमी करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी महापौर दीपमाला काळे आणि आयुक्त आदित्य जीवने यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत २०२६ ते २०३० या कालावधीत जळगाव शहर अधिक हिरवेगार करण्यासाठी व्यापक कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली. वाढत्या उष्णतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील विविध भाग, प्रमुख रस्ते तसेच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. वृक्षारोपणासोबतच झाडांचे संवर्धन आणि संगोपन यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. बैठकीस उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त संजय राऊत, पर्यावरण विभागाचे अभियंता प्रकाश पाटील तसेच ग्रीन सिटी फाउंडेशनचे विजयकुमार वाणी, डॉ. धनंजय बेंद्रे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी वृक्षारोपण केवळ औपचारिकता न राहता त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसून यावेत, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT