लोगो : सकाळ इम्पॅक्ट
........
कोचिंग सेंटर, लायब्ररींच्या
सुरक्षेवर मनपाचा फोकस
अग्निसुरक्षा परीक्षणाचे आदेश; ‘एनओसी’चीही तपासणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे कोचिंग सेंटर आणि व्यावसायिक इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर जळगाव महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच ‘सकाळ’ने ६ जूनला शहरातील इमारतीचे अग्निसुरक्षा परीक्षण (फायर ऑडिट) चिंताजन असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. लखनऊ येथील घटना व ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत अशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने पुढाकार घेत सर्व खासगी कोचिंग सेंटर्स, लायब्ररी आणि मोठ्या व्यापारी संकुलांचे अग्निसुरक्षा परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
लखनऊ दुर्घटनेच्या तपासात संबंधित इमारतीत आवश्यक अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याचे तसेच अग्निशमन विभागाचे वैध ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ उपलब्ध नसल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर जळगावातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आपत्कालीन यंत्रणा हवी
शहरातील अनेक कोचिंग क्लासेस, अभ्यासिका आणि व्यावसायिक संकुले दाट लोकवस्तीच्या भागात तसेच तळघरांमध्ये कार्यरत आहेत. अशा ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षाविषयक यंत्रणा सक्षम असणे आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले आहे.
चौकट
‘ना हरकत’ तपासणी मोहीम राबवा
मनपाच्या अग्निशमन विभागाला सर्व संबंधित आस्थापनांची तपासणी करून त्यांच्याकडे वैध ‘एनओसी’ आहे की नाही, याची माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या इमारतींमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळेल, त्यांच्यावर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. या संपूर्ण मोहिमेचा सविस्तर अहवाल लवकरच सादर करण्यास सूचना अग्निशमन विभागाला दिल्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.