नाशिक

आडवण-पारदेवीतील एक इंच जागा देणार नाही

CD
आडवण-पारदेवीतील शेतकऱ्यांचा उद्योग प्रकल्पाला ठाम विरोध जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ट्रॅक्टर मोर्चा आठ दिवसांसाठी स्थगित सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२३ : इगतपुरी तालुक्यातील आडवण-पारदेवी परिसरातील एक इंचही जमीन उद्योगासाठी देणार नाही, अशी ठाम भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेतली आहे. या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रस्तावित ट्रॅक्टर मोर्चा तूर्तास आठ दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. २३) रिंगरोड, राजूरबहुला, आडवण-पारदेवी तसेच राज्य मार्ग क्रमांक ३७ अंतर्गत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीस माजी खासदार हेमंत गोडसे, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या. आंबेबहुला व गौळाणे गावांमधून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोडचे संरेखन (अलाईनमेंट) बदलण्यात यावे, राजूरबहुला येथील एमआयडीसीसाठीच्या भूसंपादनातून बागायती क्षेत्र वगळण्यात यावे, तसेच चिंचोली-वडगाव पिंगळा-पळसे राज्य मार्ग क्रमांक ३७ साठी भूसंपादनाचा मोबदला मिळेपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात करू नये, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आडवण-पारदेवी गावातील प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेलाही स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला. एमआयडीसीसाठी कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्टपणे मांडली. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य पद्धतीने सोडविण्यासाठी प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिले. प्रशासन न्याय देण्याच्या भूमिकेत असल्याचा विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांनी नियोजित ट्रॅक्टर मोर्चा सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT