नाशिक

झाड उन्मळून वाहने चक्काचूर

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 22366 शिरपूर ः मांडळ रस्त्यावर वादळी पावसामुळे उन्मळून पडलेल्या पिंपळाच्या झाडाखाली दबून चक्काचूर झालेली रिक्षा. - झाड उन्मळून वाहने चक्काचूर - शिरपूरला पाऊस ः करवंद नाका भागात झाडे पडली - सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २३ : शहरातील मांडळ रस्त्यावर सोमवारी (ता. २२) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे एक जुने पिंपळाचे झाड अचानक उन्मळून पडले. या घटनेत झाडाखाली उभ्या असलेल्या एका रिक्षासह तीन दुचाकी आणि पत्र्याच्या शेडचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने झाड कोसळत असल्याचे पाहताच परिसरात उपस्थित नागरिकांनी वेळीच सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने जीवितहानी टळली आहे. - मांडळ रस्त्यावरील या जीर्णावस्थेतील पिंपळाच्या झाडाखाली नेहमीप्रमाणे काही वाहने पार्क केलेली होती. दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वाऱ्याचा वेग तीव्र असल्याने हे अवाढव्य झाड मुळासकट उखडून रस्त्यावर कोसळले. झाड पडल्यामुळे महावितरण कंपनीच्या विजेच्या ताराही तुटल्या असून परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. - इतरत्रही वृक्ष कोसळले या वादळाचा फटका शहराच्या इतर भागालाही बसला. करवंद नाका परिसरातही काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. मुख्य रस्त्यांवर एकापाठोपाठ एक झाडे पडल्यामुळे शिरपूर शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी रस्ता मोकळा करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT