धुळे : टुडे पान २ साठी..
--
--
वीज कोसळून ४० मेंढ्यांचा मृत्यू
--
साक्री तालुक्यातील खुडाणे शिवारातील घटना; पशुपालक जखमी
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : खुडाणे (ता.साक्री) परिसरात मंगळवारी (ता.२२) निसर्गाचा भीषण कोप पाहायला मिळाला. अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह आकाशातून कोसळलेल्या विजेमुळे तब्बल ४० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वर्षानुवर्षे कष्ट करून उभा केलेला उदरनिर्वाहाचा मुख्य कणाच एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार जैताणे (ता. साक्री) येथील रहिवासी धनराज झिपा तिरताप यांच्या मालकीच्या मेंढ्या नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तिरताप हा सकाळी खुडाणे शिवारातील डोंगराळ भागात चारण्यासाठी घेऊन गेला होता. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट सुरू झाला. काही समजण्याच्या आतच विजेचा एक जोरदार प्रहार थेट मेंढ्यांच्या कळपावर झाला. या भीषण आघातात ४० मेंढ्या जागीच ठार झाल्या. या दुर्घटनेत मेंढपाळ ज्ञानेश्वर तिरताप यांनाही विजेचा तीव्र झटका बसल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच खुडाणेचे पोलिस पाटील अनिल जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनातर्फे पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत पशुपालक तिरताप यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. प्रशासनाने लालफितीचा कारभार बाजूला ठेवून तातडीने पंचनामा पूर्ण करावा आणि पीडित गरीब कुटुंबाला भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान पावसाळ्यात नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांखाली अथवा उघड्यावर न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.