नाशिक

धुळे पाऊस दिलासा

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 22370 धुळे ः पावसामुळे छत्रीचा आसरा घेणारे वाहनधारक. -- तापमानात घट झाल्याने दिलासा - खरिपाच्या आशा पल्लवित; पारा ३३ अंशांवर घसरला - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (ता. २३) पावसाने ठिकठिकाणी दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यात सरासरी ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे तापमान या पावसामुळे थेट ३३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या धुळेकरांना मोठा दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. - मृग नक्षत्राच्या सांगता वेळीच शहरासह जिल्ह्यात सोमवारी पावसाने ठिकठिकाणी दमदार एन्ट्री केली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच पुन्हा आकाश ढगाळले होते. दुपारच्या सुमारास पावसाचे वातावरण अधिक गडद झाले आणि दुपारी पावणेतीनच्या सुमारास पावसाच्या शिडकाव्यास सुरुवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. सुमारे १० ते १५ मिनिटे शहरात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यानंतरही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सायंकाळपर्यंत आकाश पूर्णपणे ढगाळलेले असल्याने रात्रीही जोरदार पाऊस होण्याची शक्यता कायम होती. - ग्रामीण भागातही हजेरी केवळ धुळे शहरातच नव्हे, तर शिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाने चांगली हजेरी लावली. मान्सूनच्या या आश्वासक पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतकरी आता पेरणीच्या पूर्वतयारीला लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT