नाशिक

निवृत्त शिक्षकाची ३.८८ लाखांची फसवणूक

CD
निवृत्त शिक्षकाची ३.८८ लाखांची फसवणूक --- व्हॉट्सॲपवरील ‘एपीके’फाईलमुळे घडला प्रकार; गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. २३ ः व्हॉट्सॲपवर आलेल्या ‘वेडिंग इन्व्हीटेशन डॉट एपीके’ या बनावट फाईलवर क्लिक केल्याने शहरातील एका निवृत्त शिक्षकाची तब्बल तीन लाख ८८ हजार ३२७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील गडकरीनगरातील रहिवासी तथा निवृत्त शिक्षक मुनीजाकोरसर फरीदखान पठाण (वय ६३) यांना १० एप्रिलला त्यांच्या व्हॉट्सॲपवर ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने लग्नपत्रिकेसंदर्भात संदेश आला होता. त्या संदेशासोबत ‘वेडिंग इन्व्हीटेशन डॉट एपीके’ ही फाईल पाठविली होती. लग्नाचे निमंत्रण असल्याचे समजून श्री. पठाण यांनी ही फाईल उघडली. फाईल उघडल्यानंतर त्यांचा मोबाईल काही काळासाठी बंद झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यावर ‘ओटीपी’ संदेश येऊ लागले. शिवाय व्हॉट्सॲपवर आपोआप नवीन ग्रुप तयार झाल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या बँकेतील खात्यातून रक्कम काढल्याचे संदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी खात्याची तपासणी केली असता, खात्यातील पैसे परस्पर काढण्यात आल्याचे उघड झाले. बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर सायबर भामट्यांनी त्यांच्या खात्यातून विविध व्यवहारांद्वारे एकूण तीन लाख ८८ हजार ३२७ रुपये लंपास केल्याचे समोर आले. संबंधित मोबाईल हॅक झाल्याचेही निष्पन्न झाले. श्री. पठाण यांच्या संपर्क यादीतील इतर व्यक्तींनाही अशाच प्रकारची ‘एपीके’ फाईल पाठविण्यात आल्याचे दिसून आले. यासंदर्भात श्री. पठाण यांनी यापूर्वी जळगाव सायबर पोलिसांतही तक्रार नोंदविली होती. अखेर भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सावधानता बाळगावी नागरिकांनी त्यांच्या व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा इतर माध्यमांतून येणाऱ्या ‘एपीके’ फाईल्स, अनोळखी लिंक किंवा संशयास्पद ॲप्स उघडू नयेत तसेच, अशा संदेशांची तत्काळ पडताळणी करावी, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढल्याने प्रत्येकाने सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांसह सायबर तज्ज्ञांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT