नाशिक

सुरक्षा रक्षकांची मंडळात नोंदणी करा

CD
धुळे ः टुडे १ साठी, सेकंडमेन -- लोगो छायाचित्र.....झेडपीची इमारत घेणे - सुरक्षा रक्षकांची मंडळात नोंदणी करा - बंधनकारकतेमुळे धुळे जिल्हा परिषदेकडून ‘एजन्सी‘ला निर्देश - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ ः जिल्हा परिषदेमध्ये खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक (नोकरी व कल्याणाचे नियमन) अधिनियम, १९८१ नुसार सर्व सुरक्षा रक्षकांची सुरक्षारक्षक मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक रक्षकांची अद्याप नोंदणी झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित एजन्सीला तातडीने नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. - जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जळगाव येथील सुरक्षा पुरवठादार संस्थेला याबाबत लेखी पत्र पाठवले आहे. धुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा रक्षकांची मंडळाकडे त्वरित नोंदणी करून त्याचा अहवाल सादर करण्यास या पत्रात बजावण्यात आले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सुरक्षा व्यवस्थेच्या नियमावलीबाबत अधिक कडक पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. - मुदतवाढीनंतर प्रक्रिया जिल्हा परिषद मुख्यालयाच्या अहोरात्र सुरक्षेसाठी खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. नुकतीच या सुरक्षा एजन्सीच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही मुदतवाढ देतानाच सुरक्षा रक्षकांच्या कायदेशीर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सुरक्षारक्षक मंडळ ही कामगारांच्या रोजगाराचे नियमन करणारी वैधानिक यंत्रणा असून, सुरक्षा रक्षकांचे हक्क, सेवा अटी, वेतन आणि इतर कल्याणकारी सुविधांचे संरक्षण करण्याचे काम या मंडळामार्फत केले जाते. - १४-१ ...चौकट... १४-१ ६० दिवसांचा नियम कायद्यानुसार एखादा सुरक्षा रक्षक ६० दिवसांपेक्षा अधिक काळ सेवेत कार्यरत असल्यास त्याची मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. या नोंदणीमुळे सुरक्षा रक्षकांना कायदेशीर संरक्षणासह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळतो. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी जारी केलेल्या या पत्रात अधिनियम आणि संबंधित नियमांनुसार तातडीने नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांची यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात सुरक्षा रक्षकांच्या नियुक्ती आणि नोंदणी प्रक्रियेची अधिक काटेकोर अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

Manoj Jarange: मोठी दुर्घटना टळली! जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कार्यकर्ता जखमी

H1N1 Virus Delhi: दिल्लीमध्ये H1N1 चा कहर! फ्लू समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Marathi News Live Updates : पुण्यातील मंगळवार पेठेत दिवसाढवळ्या अधिवक्त्यांची दुचाकी चोरी

Ajinkya Rahane : ना रोहित, ना कोहली; निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला पहिला कॉल कुणी केला? म्हणाला, तू आणखी खेळायला हवं होतंस...

SCROLL FOR NEXT