नाशिक

त्र्यंबकेश्वरकरांची चिखलातून वाटचाल

CD
फोटो आहे. पावसातच रस्ते खोदाईचा घाट त्र्यंबकेश्वरकरांची चिखलातून वाटचाल सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता.२३ : शहरात सोमवारी पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारीही दिवसभर रिमझिम सुरूच होती. सायंकाळपर्यंत पावसाची संततधार कायम राहिल्याने शहरातील अनेक भागांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले. त्यातच विविध कामांसाठी महत्त्वाचे रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदल्याने या कामांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पावसामुळे कामांमध्ये दिरंगाई होणार असल्याचे स्पष्ट असतानाही घाईघाईत आराखडे सादर करून कामांना सुरुवात करण्यात आल्याची चर्चा आहे. या कामांत रस्त्यांच्या मधोमध वीज, दूरसंचार तसेच अन्य विविध प्रकारच्या वाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे. मोठ्या आकाराच्या पाइपलाइन, दोन्ही बाजूंच्या गटारी आणि इतर सुविधांसाठी रस्त्यांची रुंदी वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याऐवजी सध्या रस्ते खोदाईवर भर दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, कुंभमेळा विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेली ही कामे आता पावसामुळे आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत असून, आधीच खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने कामांचे योग्य नियोजन करून पावसाळ्यातील अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

SCROLL FOR NEXT