पुरामुळे बोरवणपाडा परिसरातील
दहा पाड्यांचा संपर्क मार्ग बंद
नंदुरबार, ता. २३ : तळोदा तालुक्यात मंगळवारी (ता. २३) झालेल्या पावसामुळे खर्डी खुर्द ते बोरवणपाडा दरम्यानच्या नाल्याला पूर आल्याने परिसरातील सुमारे दहा गाव-पाड्यांचा संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, कोणतीही जीवित अथवा पशुहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दीपक धिवरे यांनी दिली आहे.
बोरवणपाडा परिसरातील नाल्याला आलेल्या पुरामुळे बोरवणपाडा, टाकळी, विहिरीमाळ, बेडवाई, घोडमाग, केलापाणी, अक्राणी, हातबारी, रावलापाणी, गायमुख आदी गाव-पाड्यांकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. संबंधित गावांशी प्रशासनाचा संपर्क कायम असून, परिस्थितीवर सतत देखरेख ठेवली जात आहे. दरम्यान, खर्डी खुर्द ते बोरवणपाडा दरम्यानच्या नाल्यावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुलाचे बांधकाम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासन व महसूल यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसार प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार दीपक धिवरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.