फोटो- NSK26H22321
नाशिक : ‘सकाळ’ कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीप्रसंगी उपस्थित विभागीय क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे, क्रीडा अधिकारी क्रांती बनकर, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे सरव्यवस्थापक संजय पाटील, वृत्तसंपादक संजय वाघ, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार शरद पाटील, ओंकार पाटील, सहखजिनदार वाल्मीक बागूल, सतीश सूर्यवंशी आदी.
‘सकाळ’ कबड्डी प्रीमिअर लीग ठरेल खेळाडूंसाठी व्यासपीठ
----------------
कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून संकल्पनेचे स्वागत, सहकार्याची तयारी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : राज्य शासनाच्या क्रीडा विभागातील अधिकारी, जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमोर ‘सकाळ’ कबड्डी प्रीमिअर लीग स्पर्धेची संकल्पना मांडण्यात आली. ‘सकाळ’ कार्यालयात मंगळवारी (ता. २३) झालेल्या बैठकीत या संकल्पनेचे मान्यवरांनी स्वागत केले, तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
या बैठकीप्रसंगी विभागीय उपसंचालक (क्रीडा) स्नेहल साळुंखे, क्रीडा अधिकारी क्रांती बनकर, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, तसेच जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार शरद पाटील, सहखजिनदार वाल्मीक बागूल, आंतरराष्ट्रीय पंच सतीश सूर्यवंशी, प्रशिक्षक ओंकार पाटील आदी उपस्थित होते. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे सरव्यवस्थापक संजय पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून
प्रास्ताविकात मातीतील खेळ मोठा व्हावा, या भावनेतून ‘सकाळ’तर्फे कबड्डी लीगचे आयोजन केल्याचे नमूद केले. या व्यासपीठामुळे उदयोन्मुख खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यानंतर ‘सकाळ कबड्डी प्रीमिअर लीग’ची संकल्पना पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आली. त्यांनी काही सूचना करीत या लीगमुळे खेळाडूंना वाव मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि राज्य शासनाचा क्रीडा विभाग यांनी ‘सकाळ’च्या उपक्रमास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्हा संघटनेशी संलग्न २३ वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे वृत्तसंपादक संजय वाघ यांनी आभार मानले.
----
बैठकीतील चर्चेच्या ठळक नोंदी...
- आठ संघांचा असेल सहभाग
- २३ वर्षांखालील खेळाडूंना संधी
- फ्रँचायजी संकल्पनेवर संघ निवड
- लीग पद्धतीने खेळविणार सामने
- सामना, स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना भरघोस बक्षिसे
- विजेत्या संघाला मिळेल करंडक, रोख पारितोषिक
- नामांकित संस्था, कंपन्या, व्यवसायांना जोडले जाण्याची संधी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.