नाशिक

एटिएमचे कॅशबॉक्स गॅसकटरने कापण्याचा प्रयत्न

CD
NSK26H22379, NSK26H22380 जळगाव : पंचनामा करताना पोलिस पथक. दुसऱ्या छायाचित्रात एटीएमचा निम्म्याहून अधिक कापलेला कॅशबॉक्स. --- NSK26H22381 जळगाव : चोरटे सोडून गेलेले गॅसकटर मशीन व साहित्य. --- एटीएमचा कॅशबॉक्स कापण्याचा प्रयत्न --- जळगावातील घटना; ‘एसबीआय’च्या फायर आलार्म सिस्टिममुळे रोकड सुरक्षित सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत जळगाव- अजिंठा राज्य महामार्गावर जळगाव तोलकाट्याजवळील एटीएम फोडण्याचा मध्यरात्री प्रयत्न झाला. सुदैवाने एटीएमच्या फायर आलार्म सिस्टिमने वेळीस यंत्रणेला अलर्ट दिल्याने एटीएममधील रोकड सुरक्षित राहिली. पोलिस घटनास्थळी धडकले. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. जळगाव- अजिंठा रस्त्यावर जळगाव तोलकाट्याजवळील कॉम्प्लेक्समध्ये भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. सोमवारी (ता.२२) मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी गॅसकटर आणि एटीएम तोडण्याचे साहित्य घेऊन एटीएममध्ये प्रवेश केला. गॅस कटरने एटीएम कापून काढल्यानंतर एटीएमच्या कॅशबॉक्सजवळील सेन्सरचा आलार्म एसबीआयच्या सेंट्रलाइज्ड सिस्टिममध्ये वाजला. तत्काळ अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस ठाण्याला संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. मात्र, पोलिस आल्याची चाहूल चोरट्यांना लागल्याने त्यांनी केबिनमधून पळ काढला. गॅस कटर जप्त एटीएम कापण्यात निष्णांत असलेला एक चोरटा एटीएमचा बॉक्स कापत असताना, दोघे पाळतीसाठी बाहेर उभे होते. पोलिस येत असल्याची चाहूल लागताच त्यांनी आतील साथीदाराला संकेत देत सर्व साहित्य सोडून पळ काढला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे चंद्रकांत पाटील, प्रदीप पाटील, किरण पाटील यांना नुकतेच अर्धवट टाकपलेले एटीएम आणि गॅस कटर व चोरट्यांचे इतर साहित्य मिळून आले. सकाळी एमआयडीसी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. चौकट सहा-सात लाखांची रोकड सुरक्षित चोरट्यांनी निम्मेपेक्षा जास्त एटीएम यंत्र कापले होते. मात्र, ऐन वेळी पेालिस येत असल्याने त्यांनी पळ काढला. विशेष म्हणजे पोलिस येत असताना चोरटे आतमध्ये एटीएम यंत्र कापून पूर्ण करीत होते. थोडा विलंब झाला असता, तर आतील रक्कम काढून चोरटे पसार झाले असते. मात्र, चोरट्यांना काम अर्धवट सोडून पळ काढावा लागल्याने एटीएम यंत्रातील सुमारे ६ ते ७ लाखांची रक्कम सुरक्षित राहिल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT