नाशिक

पेट्रोलची जादा दराने विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई

CD
पेट्रोलची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई नंदुरबार : पेट्रोलची बेकायदेशीर साठवणूक करून जादा दराने विक्री करणाऱ्या दोघांवर अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकलेश्‍वर- बऱ्हाणपूर महामार्गावर अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा गावात पुरवठा विभागाने ही कारवाई केली. तहसील कार्यालय अक्कलकुवा येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी नीलिमा देवीदास काळमेध यांनी अक्कलकुवा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेश नमला तडवी (रा. सोरापाडा) आणि नीतेश रतिलाल पाडवी (रा. चोखीआमली, ता. कुकरमुंडा, जि. तापी, गुजरात) या दोघांकडे पेट्रोल विक्रीचा कोणताही परवानगी नसताना ते बेकायदेशीर पेट्रोलची विक्री करीत होते. मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने उघड्यावर साठवणूक करून विक्री केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आठ ते दहा ड्रममध्ये भरलेले २१ हजार ६७० रुपये किमतीचे पेट्रोल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. पोलिस हवालदार उत्तम पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : भारताकडे स्थिर राजकीय नेतृत्व, मजबूत लोकशाही, सक्षम न्यायव्यवस्था अन् मार्गदर्शक संविधान - पंतप्रधान नरेंद्र मोदी

El Nino Alert : पुढील वर्षाच्या मॉन्सूनबाबत हवामान विभागाचे मोठे संकेत! प्रशांत महासागराचे तापमान होणार कमी; 'एल निनो' ओसरणार? 'नोआ'च्या अहवालाने वाढवली चिंता

HOROSCOPE: १५ ऑगस्टपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरू; आर्थिक स्थिती सुधारणार अन् करिअरमध्ये मिळणार मोठं यश, तुमची रास कोणती?

Census 2026: जनगणनेसाठी ४० प्रश्‍नांची सूची; स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातिगणनाही होणार

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT